....आणि प्रियदर्शनलाही वाटते या गोष्टीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 09:24 AM2018-11-16T09:24:59+5:302018-11-16T09:27:23+5:30

अशा वातावरणात चित्रीकरण करताना प्रियदर्शन बराच दचकत होता. त्याला अंधाराची भीती वाटू लागली होती. पहिल्यांदाच या सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला किस्सा प्रियदर्शन उघडपणे सांगितला आहे.

.... and Priyadarshan also feels afraid of this | ....आणि प्रियदर्शनलाही वाटते या गोष्टीची भीती

....आणि प्रियदर्शनलाही वाटते या गोष्टीची भीती

googlenewsNext

भीती ही श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. मग यात सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा अभिनेता असो. मनुष्य स्वभावाप्रमाणे त्यालाही भीती वाटणे साहजिकच आहे.अभिनेता प्रियदर्शनालाही 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाच्या चित्रीकरणाच्यावेळी भीती वाटली होती. या सिनेमाचे चित्रीकरण भोर येथे सुरु होते. या सिनेमातील काही भुताची दृश्य चित्रित करण्यात येणार होती. त्यामुळे सेटवर अंधार करण्यात आला होता.  अशा वातावरणात चित्रीकरण करताना प्रियदर्शन बराच दचकत होता. त्याला अंधाराची भीती वाटू लागली होती. पहिल्यांदाच या सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला किस्सा प्रियदर्शन उघडपणे सांगितला आहे.प्रियदर्शन व अनिकेतसोबत भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, स्वाती पानसरे, अंशुमन विचारे, पदम सिंह, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची पटकथा अभिजित गाडगीळ तर संवाद संदीप दंडवते यांनी लिहिली आहे.

माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील नुकतेच एक गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी, संगीत राजु सरदार यांचे आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हे गाणे मीरा जोशी व मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रियदर्शन जाधववर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांची धमाल केमिस्ट्री आणि मीराच्या मनमोहक अदा यामुळे हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. 

राजीव एस.रुईया हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. येत्या २३ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. विवेक कर, राजू सरदार व प्रभाकर नरवडे यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली आहे. 

Web Title: .... and Priyadarshan also feels afraid of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.