'...आणि ही बळजबरी नाही'; अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:58 PM2022-07-06T12:58:58+5:302022-07-06T12:59:42+5:30
अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar)ची सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. संतोश जुवेकर सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असतो. दरम्यान त्याची सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने दत्तक पालक योजनेबद्दल जनजागृती केली आहे.
अभिनेता संतोष जुवेकरने एक फोटो शेअर करत लिहिले की, घरच्यांना बरोबर मित्र मैत्रिणींन बरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६-७ हजार बिल सहज येते. मग जर फक्त १० हजारात जर आपण एखाद्या मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो. वर्षातन एखादी गोव्याची ट्रीप केली तरी २०-२५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण. आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच करावे पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणून. आणि ही बळजबरी नाही.
संतोषने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, ऊन-पाऊस, किमयागार या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजलेल्या आहेत. 'झेंडा', 'मोरया', ' रेगे' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. शेवटचा तो 'हिडन' या चित्रपटात झळकला आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून यात त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.