..अन् 'वेड' लागलं!, जितेंद्र जोशीनं रितेश आणि जिनिलियाच्या सिनेमावर उधळली स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:18 PM2022-12-29T12:18:13+5:302022-12-29T12:19:15+5:30

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) - जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (३० डिसेंबर) प्रदर्शित होतो आहे.

..And 'Ved' started!, Jitendra Joshi showered praises on Ritesh and Genelia's film. | ..अन् 'वेड' लागलं!, जितेंद्र जोशीनं रितेश आणि जिनिलियाच्या सिनेमावर उधळली स्तुतीसुमने

..अन् 'वेड' लागलं!, जितेंद्र जोशीनं रितेश आणि जिनिलियाच्या सिनेमावर उधळली स्तुतीसुमने

googlenewsNext

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) - जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (३० डिसेंबर) प्रदर्शित होतो आहे. रिलीजआधीच या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. नुकताच या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या कलाकारांवरही या चित्रपटाने चांगलीच भुरळ घातली आहे. दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशीनेवेड चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मांडली आहे.

जितेंद्र जोशीने इंस्टाग्रामवर रितेश आणि जिनिलियासोबत फोटो शेअर करत लिहिले की, आज वेड चित्रपट पाहिला आणि वेड लागलं!! रितेश भाउंचं दिग्दर्शनात पदार्पण होतंय परंतु आपला ५० वा चित्रपट करावा या सफाईने आणि बारकाव्या ने त्यांनी दिग्दर्शन केलंय आणि अभिनय सर्वोत्तम केलाय. जेनीलिया देशमुख यांच्या कडून त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम काम काढून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शुभंकर तावडे च्या प्रामाणिक कामाला तोड नाही. रवी राज ने त्याच्या पहिल्याच सिनेमात साकारलेला खलनायक अप्रतिम . जिया शंकर सुद्धा उत्तम परंतु या चित्रपटात असलेल्या खुशी नावाच्या अगदी नावाप्रमाणेच असलेल्या चिमुरडी ने मला खरोखर वेड लावलं. बाकी अशोक मामांविषयी मी काय बोलू? ते करू शकत नाहीत असा कुठलाही रोल नाही. या वयात, इतके सिनेमे केल्यानंतर देखील मला थक्क करून सोडलं त्यांनी!!


त्याने पुढे म्हटले की, आमच्या प्राजक्त देशमुख या वेड्या लेखकाचे संवाद जेनेलिया देशमुखयांच्या डोळ्यां इतके, रितेश भाऊंच्या प्रामाणिकपणा इतके आणि अशोक मामांच्या अभिनयाच्या प्रेमा इतकेच बोलके आहेत. अजय अतुल हे मराठी मनाला पडलेलं अभूतपूर्व स्वप्न आहे जे त्यांच्याच सुरां मार्फत आपण बघत राहतो आणि त्याला रितेश भाऊंनी बोलकं केलं आहे. सौरभ भालेरावचं पार्श्वसंगीत सिनेमाचा आत्मा आहे. रोहन मापुस्कर या ही कास्टिंगसाठी तुझे आभार.
वेड चित्रपटाने मराठी सिनेमाला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होऊन हाऊसफुल्ल चे बोर्ड लागतील अशी आशा आहे. मराठी सिनेमा सर्वार्थाने मोठा करण्याची किमया फक्त प्रेक्षकांच्या हाती आहे आणि यंदा ही ते होईल अशी अपेक्षा. भाऊ तुम्ही कडक फिल्म बनवली. आता थांबू नका!! लव्ह यू.

Web Title: ..And 'Ved' started!, Jitendra Joshi showered praises on Ritesh and Genelia's film.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.