Anil Kapoor : अनिल कपूरला आली लक्ष्याची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला, 'हमाल दे धमाल...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:18 IST2023-02-28T13:16:58+5:302023-02-28T13:18:01+5:30
अनिल कपूरने पोस्ट केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी काही वेळातच व्हायरल झाली.

Anil Kapoor : अनिल कपूरला आली लक्ष्याची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला, 'हमाल दे धमाल...'
Anil Kapoor : राज्यात काल मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनेही एक खास पोस्ट केली. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) सोबत फोटो शेअर करत त्याने 'मराठी भाषा दिवस' च्या शुभेच्छा दिल्या.
अनिल कपूरनेलक्ष्मीकांत बेर्डे सोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'महाराष्ट्रातील सर्वांनाच मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा, आज माझ्या हमाल दे धमाल या एकमेव मराठी सिनेमाची आठवण आली. या सिनेमात काम करणं माझं सौभाग्य होतं. तसंच हा सिनेमा माझा मित्र लक्ष्मीकांत बेर्डेच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सिनेमा होता. त्याची आजही खूप आठवण येते.'
अनिल कपूरने पोस्ट केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी काही वेळातच व्हायरल झाली. लक्ष्याची मुलं अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांनीही ही स्टोरी रिपोस्ट केली. 1989 मध्ये 'हमाल दे धमाल' हा सिनेमा रिलीज झाला होता जो तुफान हिट झाला. यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर, सचिन पिळगांवकर आणि अनिल कपूरचीही भूमिका होती.