रणवीर सिंहबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? अनेक मराठी चित्रपटांत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:28 IST2023-10-11T14:27:42+5:302023-10-11T14:28:51+5:30
एका मराठी कलाकाराने रणवीरबरोबरचा फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

रणवीर सिंहबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? अनेक मराठी चित्रपटांत केलंय काम
रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला', 'सिम्बा', 'सूर्यवंशी', 'गली बॉय' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारून रणवीरने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. सामान्य प्रेक्षकांबरोबरच अनेक सेलिब्रिटीही रणवीरचे चाहते आहेत. नुकतंच एका मराठी कलाकाराने रणवीरबरोबरचा फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
रणवीरबरोबर फोटोत दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अंकित मोहन आहे. अंकितने रणवीरसोबतचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने "तुझ्यातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तूच आहेस. मनापासून आदर आणि प्रेम. बाजीराव आणि मुरारबाजी", असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमुळे आता अंकित रणवीरबरोबर स्क्रीन शेअर करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
अंकित मोहनने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' या ऐतिहासिक चित्रपटांतील त्याच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. त्याने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. २०१५ साली त्याने मराठमोळी अभिनेत्री रुची सवर्णबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आहे.