​जगा वेगळी अंतयात्रा करणार सुशिक्षित बेकारीवर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 04:58 AM2018-03-06T04:58:12+5:302018-03-06T10:28:12+5:30

आपल्या देशाला विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचवेळी सुशिक्षित बेकारांची समस्या देखील निर्माण झाली आहे. या ...

Announcement for a separate interval of the world, educated unemployment | ​जगा वेगळी अंतयात्रा करणार सुशिक्षित बेकारीवर भाष्य

​जगा वेगळी अंतयात्रा करणार सुशिक्षित बेकारीवर भाष्य

googlenewsNext
ल्या देशाला विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचवेळी सुशिक्षित बेकारांची समस्या देखील निर्माण झाली आहे. या समस्येवर मनोरंजनाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न जगा वेगळी अंतयात्रा या चित्रपटातून करण्यात आले आहे. हा चित्रपट २३  मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 
डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.लि. या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमोल लहांडे यांनी चित्रपटाचे  लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. अभिनेता भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे या नव्या दमाच्या कलाकारांनी चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत. रोहन रोहन या आजच्या पिढीच्या संगीतकारद्वयीने चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाचे शीर्षक जरी गंभीर वाटले, तरी हा चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहे. 
इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट अशा क्षेत्रात उच्चशिक्षण घेतल्या चार तरुणांची गोष्ट जगा वेगळी अंतयात्रा या चित्रपटात उलगडली आहे. सुशिक्षित बेकारीच्या यक्षप्रश्नावर हे तरुण कशा पद्धतीने मार्ग काढतात हे विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्यामुळे एक आगळीवेगळी कथा, त्याची साजेशी मांडणी आणि निखळ मनोरंजन असे सारे काही या चित्रपटात आहे. केवळ मनोरंजनच नाही तर माणुसकी संपत चाललेल्या आजच्या जगात प्रत्येकाला स्वतःचे आत्मचिंतन करायलाही हा चित्रपट भाग पाडतो. केवळ आपल्यापुरता विचार करणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचाही प्रयत्न या निमित्त करण्यात आला आहे. गंभीर विषयाला विनोदी अंगाने मांडण्याचा केलेला  प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे,हसता हसता एका महत्वाच्या समस्येबाबतही हा सिनेमा विचार करायला प्रवृत्त करणारा असल्याचे दिग्दर्शक अमोल लहांडे यांनी सांगितले.
बऱ्याच दिवसांनी एका चांगल्या कथानकाचा चित्रपट बघितल्याचे समाधान या निमित्ताने सिनेरसिकांना मिळणार आहे अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला "जगावेगळी अंतयात्रा"२३ मार्चला चित्रपटगृहात!

Web Title: Announcement for a separate interval of the world, educated unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.