‘मंकी बात’मधले आणखीन एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 04:10 AM2018-05-07T04:10:55+5:302018-05-07T09:40:55+5:30

एक कोवळं रोपटं...त्याच्या जागेवर आनंदाने‌ डोलणारं....अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं ?  कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात...मित्रांमध्ये...रमलेला हा ...

Another song in 'Monkey talk' is about the audience's meeting | ‘मंकी बात’मधले आणखीन एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘मंकी बात’मधले आणखीन एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
कोवळं रोपटं...त्याच्या जागेवर आनंदाने‌ डोलणारं....अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं ?  कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात...मित्रांमध्ये...रमलेला हा मुलगा..".वायू "..... त्याला अचानक उचलून‌ मुंबईत आणलं आई-बाबांनी.... गोंधळलेल्या... घुसमटलेल्या वायूच्या मनांत आलेला हा वैताग...श्या... कुठे येऊन पडलो यार....श्या...!!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी धम्माल, मस्ती करण्याची पर्वणीच.सुट्ट्यांमध्ये लहान मुले मनसोक्त खेळतातआणिबागडतात. अशातच त्यांच्या सुट्ट्या अधिक रंगतदार करण्यासाठी दिग्दर्शक विजू माने घेऊन आले आहेत बालचित्रपट ‘मंकी बात’. नुकतेच या चित्रपटातील श्या... कुठे येऊन पडलो यार....श्या...!! हे गाणे रिलीज झाले असून हे गाणे अल्पावधीत मुलांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरले आहे.

जरा काही आवडेनासं झाला  की “श्या...” म्हणत कंठ काढताना आपण लहान मुलांना बघितले असेलच.‘मंकी बात’ मधील वायू मुंबई शहरात येण्यापूर्वी मस्त कोल्हापुराला राहायचा.तेथीलजिवलग मित्रांचा सहवास आणि सोबतीला नदी, दऱ्या, डोंगर होता, या सर्व गोष्टीत तो रमून जायचा. नयनरम्य निसर्ग आणि बागडण्यासाठी त्याला पूर्ण रानं मोकळ होते.शहरात आल्यानंतर मात्र मर्यादित जागेचं आयुष्य त्याला आवडेनासं झाले. त्याचाशी कुणी लवकर गट्टी करेना, कुणी सोबत खेळू देईना. शिवाय शाळेतही जीवाला खाणारा एकटेपणा आहेच यामुळे वायू म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....!!

प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांची  ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसादा चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची गीते आणि संवाद  संदीप खरे यांचे तर  संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे.  ‘मंकी बात’ मध्ये बाल कलाकार वेदांत, पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत.चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची आहे. खास बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारा हा चित्रपट येत्या १८ मी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Another song in 'Monkey talk' is about the audience's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.