'नवं घर लवकरच…', अभिनेता अंशुमन विचारेने दाखवली पहिली झलक; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:11 IST2023-12-13T19:08:33+5:302023-12-13T19:11:08+5:30
अंशुमनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

'नवं घर लवकरच…', अभिनेता अंशुमन विचारेने दाखवली पहिली झलक; पाहा व्हिडीओ
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा होत असते. यात बऱ्याचदा तो त्याच्या फनी व्हिडीओमुळे चर्चेत येत असतो. परंतु, यावेळी तो एका वेगळा कारणामुळे चर्चेत आला आहे. अंशुमनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अंशुमनने नुकतंच स्वप्ननगरी मुंबईत स्वतः च नवीन घर खरेदी केलं आहे. सध्या त्या घराच्या बांधकामाचे काम चालू आहे. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी अंशुमन व त्याची पत्नी पल्लवीने भेट दिली. तसेच व्हिडीओ शेअर करत तिथली खास झलक त्यांनी चाहत्यांना दाखवली. 'नवं घर लवकरच…खूप खूप वाट पाहात आहोत', असं कॅप्शन त्यांन या व्हिडीओला दिलं आहे. अंशुमनने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अंशुमन मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, घरोघरी, कानामागून आली, या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर, संघर्ष, भरत आला परत, मिसळ पाव, सूर राहू दे, शिनमा, परतू, पोश्टर बॉईज, वेड लावी जिवा या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.