मी तुला म्हातारी होऊच नाही देणार...! अंशुमन विचारेच्या लेकीचा हा व्हिडीओ पाहून म्हणाल SO CUTE
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 11:01 IST2021-03-12T11:00:59+5:302021-03-12T11:01:14+5:30
अन्वीन आईसाठी बनवलंय जेवण...नंतर काय म्हणते पाहा...

मी तुला म्हातारी होऊच नाही देणार...! अंशुमन विचारेच्या लेकीचा हा व्हिडीओ पाहून म्हणाल SO CUTE
आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवत ठेवणारा अभिनेता अंशुमन विचारे जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच त्याची चिमुकली अर्थात लेक अन्वी सुद्धा आहे. अन्वीचे एक ना अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ताजा व्हिडीओत तर सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ इतका क्यूट आहे की, चाहते या चिमुकल्या अन्वीच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. आई मी तुला म्हातारी होऊच देणार नाही, असे आईसाठीचे अन्वीचे बोबडे बोल मनाला स्पर्शून जातात.
या व्हिडीओत अन्वी आणि तिच्या आईचा संवाद आहे. अन्वी काय करतेय, तर आपल्या आईसाठी जेवण बनवतेय. याचदरम्यान मायलेकींचा संवाद सुरु होतो. तू बनवलं माझ्यासाठी जेवायला? असे आई म्हणते. यावर हो, असे अन्वी म्हणते. तू माझी काळजी घेणार मम्मा? माझे लाड करणार? मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळणार?, अशी आई अन्वीला विचारते. यावर तू म्हातारी होणार मग मी घाबरणार, पण मी म्हातारीला घाबरते. मी तुला म्हातारी होऊच नाही देणार, कारण तू माझी मम्मा आहे आणि तू मला सुंदर दिसते. आता मी साबुदाण्याची खिचडी करते, असे अन्वी म्हणते. लेकीच्या तोंडचे शब्द ऐकून आई तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करते.
अन्वीच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा तुफान पाऊस पडत आहे. तितक्याच प्रमाणात व्हिडिओ व्हायरलही होत आहे.
एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. श्वास, पोस्टर बॉईज, स्वराज्य, विठ्ठला शप्पथ अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोर्चा या सिनेमाद्वारे त्याने गायनाच्या क्षेत्रात देखील प्रवेश केलेला आहे.