नात्यातील विसंवादाचा 'अनुराग'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2016 01:25 PM2016-02-26T13:25:40+5:302016-02-26T06:25:40+5:30
लग्न, प्रेम, पती-पती या विषयावर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले. अलीकडच्या काळात प्रेमाची गोष्ट, अजिंक्य, मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न ...
ल ्न, प्रेम, पती-पती या विषयावर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले. अलीकडच्या काळात प्रेमाची गोष्ट, अजिंक्य, मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न पहावे करून अशा अनेक चित्रपटांची उदाहरणं देता येतील. या चित्रपटांतून पती-पत्नीच्या नात्याचे हळूवार पदर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता 'अनुराग' या चित्रपटातून पती-पत्नीचं नात्याचा वेगळ्या पद्धतीनं विचार करण्यात आला आहे. धर्मेंद्र गोहिल आणि मृण्मयी देशपांडे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्नानंतरच्या एका टप्प्यावर नात्यात होणारी घुसमट, हरवलेलं सहजीवन, नात्यातील विसंवाद, त्यावर त्यांनी काढलेला मार्ग या आशयसूत्रावर 'अनुराग' बेतला आहे. कौटुंबिक विषय मांडतानाच केवळ दोनच व्यक्तिरेखा चित्रपटात असण्याचा प्रयोगही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे वेगळा अनुभव ठरणार आहे. आरआरपी कॉपोर्रेशन लिमिटेडने निर्मिती आणि डॉ. अंबरीश दरक यांनी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलेला हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
मृण्मयी झाली प्रस्तुतकर्ती
अलीकडे मराठी चित्रपटात निर्मात्यासह वेगळा प्रस्तुतकर्ता असण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. दिग्दर्शक रवी जाधवनं काही चित्रपट प्रस्तुत केले आहे. आता त्यानंतर मृण्मयी देशपांडे प्रस्तुतकर्ती म्हणून समोर येत आहे. आपल्या उत्तम अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणा?्या मृण्मयीनं ही नवी वाटचाल सुरू केली आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला अनुराग हा चित्रपट ती प्रस्तुत करत आहे. ''अनुराग' हा माज्यासाठी केवळ चित्रपट नाही. तो शब्दातीत अनुभव आहे. चांगल्या चित्रपटासाठी अशी जबाबदारी घेण्यात मला काहीही धोका वाटला नाही. त्याशिवाय या चित्रपटाच्या टीमशी माझं ट्युनिंग उत्तम जमलेलं असल्यानं वेगळी जबाबदारी घेण्यासाठी, प्रयोग करून पाहण्यासाठी हीच संधी योग्य वाटली. चांगल्या कामासाठी धोका पत्करणं मला महत्त्वाचं वाटलं. मराठी चित्रपटात होत असल्याचे वेगळ्या प्रयोगांना आपणच बळ दिलं पाहिजे,' अशी भावना तिनं व्यक्त केली. मृण्मयी देशपांडे क्रिएशन्सच्या माध्यमातून ती हा चित्रपट सादर करत आहे. आरआरपी कॉपोर्रेशन लिमिटेडने निर्मिती आणि डॉ. अंबरीश दरक यांनी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलेला हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.