प्रेमासाठी वाट्टेल ते..! चक्क भावी पत्नीसाठी हा मराठी अभिनेता बनला तिचा स्टायलिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 19:02 IST2019-12-26T19:01:49+5:302019-12-26T19:02:30+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील हे कपल सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

प्रेमासाठी वाट्टेल ते..! चक्क भावी पत्नीसाठी हा मराठी अभिनेता बनला तिचा स्टायलिस्ट
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी भावी पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघं सातत्याने सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात. या दोघांचा यावर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला. त्याआधीपासून ते दोघे सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात. नुकतेच मिताली मयेकर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच स्टनिंग दिसतेय. मात्र यात तिने दिलेल्या क्रेडिटमध्ये एका नावाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
मिताली मयेकर हिने पिंक रंगाच्या आऊटफिटमधील एक फोटो नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच स्टनिंग दिसते आहे. या फोटोमध्ये क्रेडिट देताना तिने स्टायलिस्ट म्हणून तिचा होणारा भावी पती सिद्धार्थ चांदेकरचे नाव लिहिले आहे आणि सोबत माझे प्रेम व हौशी नवीन स्टायलिस्ट असं म्हटलं आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
'उर्फी' चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या 'फ्रेशर्स' मालिकेतही मितालीने काम केलं. तिचा काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडा केला.
गुलाबजाम, क्लासमेट यांसारखे अनेक चित्रपट 'अग्निहोत्र', 'प्रेम हे' यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्या दोघांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्यांच्या दोघांचे अनेक फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.
सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते.
सिद्धार्थने याबाबत सांगितले होते की, 'हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रीप हा विषय यात हाताळला गेला आहे. आलोक राव हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.