अभिनयाशिवाय सई ताम्हणकर करते हे वेगळं काम, वाचून कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:17 IST2022-08-08T16:17:10+5:302022-08-08T16:17:35+5:30
Sai Tamhankar: मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात नाव आजमावतात. सईदेखील अभिनयाशिवाय वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे समोर आले.

अभिनयाशिवाय सई ताम्हणकर करते हे वेगळं काम, वाचून कराल कौतुक
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात नाव आजमावतात. कुणी हॉटेल सुरू केलंय, तर कुणाचं ज्वेलरी ब्रॅण्ड किंवा कश्च्युमचा व्यवसाय आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar)चा देखील यात समावेश आहे. मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई लोकप्रिय आहे. आजवर विविध भूमिका तिने साकारल्या आहेत. सई अभिनयाशिवाय वेगळं काम देखील करते. सईचा व्यवसाय असून तिचा स्वतःचा एक कपड्यांचा ब्रॅंड आहे.
'द सारी स्टोरी' असं सई ताम्हणकरच्या साडीचा ब्रॅण्ड आहे. सोशल मीडियावर देखील सई याचं प्रमोशन करत असते. अनेक प्रकारच्या साड्या तिच्या या ब्रँडमध्ये मिळतात. श्रुती भोसले आणि सई या दोघी मिळून हा ब्रँड सांभाळतात. ब्लॅक अँड व्हाईट या चित्रपटापासून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. मराठी तसेच हिंदी चित्रपटांतही तिने काम केले आहे. तिची आज मोठे फॅनफॉलोइंग देखील आहे.
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. या शोमध्ये तिच्याबरोबर प्रसाद ओक देखील परीक्षक आहे.
तिचा 'पाँडेचेरी' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत वैभव तत्त्ववादी मुख्य भूमिकेत आहे. तसेच नुकतीच सई मिडियम स्पाईसी या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे मुख्य भूमिकेत होते.