बाबो! 'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णीने चक्क केला ट्रेनने प्रवास, तोही खास व्यक्तीसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:26 IST2022-03-30T13:26:22+5:302022-03-30T13:26:54+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) हिने देखील मुंबई लोकलने प्रवास केला आहे. तिने या प्रवासादरम्यानचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

बाबो! 'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णीने चक्क केला ट्रेनने प्रवास, तोही खास व्यक्तीसोबत
सेलिब्रेटींना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ते लोकल ठिकाणी स्पॉट झाले की तिकडे गर्दी ही झालीच पाहिजे. त्यामुळे सेलिब्रेटी लोकल ठिकाणी जाणे शक्यतो टाळतात. मात्र तरीदेखील काही जण शक्कल लढवून वावरतात. काही दिवसापूर्वी अभिनेत्री प्रिया मराठेने मुंबई लोकलने प्रवास केला होता आणि तिचा तो फोटो चर्चेत आला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने नुकताच लोकलचा प्रवास केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) हिने देखील मुंबई लोकलने प्रवास केला आहे. तिने या प्रवासादरम्यानचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी हिने नुकताच मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी तिच्यासोबत तिची आई देखील आहे. सोनालीने बऱ्याच काळानंतर लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. तिने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करत तिचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोनाली कुलकर्णीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "सावी कुलकर्णीसोबत अनेक वर्षानंतर मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास".
सोनालीने या मुंबई लोकल राईडचा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. विशेष बाब म्हणजे ट्रेनमधून प्रवास करत असताना कोणीही सोनालीला ओळखले नाही. कारण तिने प्रवासादरम्यान मास्क घातला होता. तसेच तिचा संपूर्ण गेटअप देखील कॉमन मुलींसारखाच होता. यावेळी तिने कुर्तीमध्ये दिसली, त्यामुळे तिला ओळखणे तसे कठीणंच होते.