'रात्रीस खेळ चाले2' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने घेतली अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:48 AM2019-02-18T10:48:08+5:302019-02-18T11:01:10+5:30

‘रात्रीस खेळ चाले2’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे.  तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

Apurva nemlekar put on her weight for serial ratris khel chale2 | 'रात्रीस खेळ चाले2' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने घेतली अशी मेहनत

'रात्रीस खेळ चाले2' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेसाठी अपूर्वाने घेतली अशी मेहनत

googlenewsNext
ठळक मुद्देअपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे शेवंताच्या भूमिकेसाठी ५ ते ७ किलो वजन वाढवलं आहे

रात्रीस खेळ चाले2’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे.  तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. 

शेवंताची लोकप्रियता इतकी वाढली आहे कि सोशल मीडियावरदेखील शेवंताचे मिम्स, पोस्ट्स, फोटोज आपल्याला दररोज पाहायला मिळतात. हि व्यक्तिरेखा जितकी लोकप्रिय झाली आहे तितकंच ती साकारणं हे अपूर्वासाठी आव्हानात्मक होत आहे. हि व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने वजन देखील वाढवलं आहे. त्याबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, "शेवंता ही अण्णांना शोभून दिसली पाहिजे म्हणून मालिकेची संपूर्ण टीम, झी मराठी वाहिनीची टीम आणि आमचे दिग्दर्शक खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे मी डोळे झाकून त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करतेय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी शेवंताच्या भूमिकेसाठी ५ ते ७ किलो वजन वाढवलं आहे. प्रत्येक कलाकार हा एका आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असतो आणि तशी भूमिका मिळणं देखील नशिबाचा भाग आहे. जेव्हा मी प्रेक्षकांसमोर शेवंता म्हणून आले तेव्हा पासून मला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर तर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सगळं पाहून मला खूप बरं वाटतंय. माझ्या कामाची मला पावती मिळतेय आणि अजून जोमात काम करायची उमेद देखील मिळते."

दिवसांदिवस या मालिकेत नवं ट्विस्ट आणि टर्नस येतायेत त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

Web Title: Apurva nemlekar put on her weight for serial ratris khel chale2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.