​आर्चीची सोलापुरात छेडछाड; आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 03:57 AM2017-03-23T03:57:57+5:302017-03-23T09:27:57+5:30

‘सैराट’या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरु हिला सोलापुरात छेडछाडीला ...

Archaea teasing in Solapur; The accused arrested | ​आर्चीची सोलापुरात छेडछाड; आरोपीस अटक

​आर्चीची सोलापुरात छेडछाड; आरोपीस अटक

googlenewsNext
ैराट’या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरु हिला सोलापुरात छेडछाडीला सामोरे जावे लागले. सोलापुरातील अकलूज येथे हा प्रकार घडला. दरम्यान रिंकूची छेड काढणाºयास पोलिसांनी अटक केली आहे. अकलूज पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

यानंतर आरोपीस रात्री उशीरा माळशिरस येथील दिवाणी न्यायालयात  हजर करण्यात आले. आज या प्रकरणाची पुढील सुनावणी  होणार आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या दहावीची परीक्षा देत आहे. सैराट सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सैराट सिनेमाच्या कन्नड रिमेकमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे.नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले होते. या चित्रपटाचा कन्नड रिमेक ‘मनसु मल्लिगे’ या नावाचा कन्नड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ALSO READ : हे पाहा.... 'झिंगाट' गाण्याचं कन्नड व्हर्जन

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर रिंकू पुन्हा एकदा प्रेक्षकांना याड लावणार, असेच दिसतेय. ‘मनसु मल्लिगे’मध्ये मराठी ‘सैराट’चे संगीत काही बदल न करता तसंच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा झिंगाट होताना दिसतील. काही दिवसांपुर्वी ‘सैराट’च्या कन्नड व्हर्जनमधील झिंगाटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. भाषा कळत नसली तरी त्यातील भावनांनी लोकांना ठेका धरायला भाग पाडले होते.  ‘मनसु मल्लिगे’  या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश यांची आहे. ‘सैराट’च्या कन्नड भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने विकत घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत. लवकरच ‘सैराट’चा हिंदी रिमेक सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Archaea teasing in Solapur; The accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.