आर्ची उर्फ रिंकूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:27 PM2019-07-25T12:27:21+5:302019-07-25T12:27:56+5:30

रिंकु झी टॉकिडटच्या कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स करणार आहे.

Archie aka Rinku Rajguru's dance performance video | आर्ची उर्फ रिंकूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडिओ

आर्ची उर्फ रिंकूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडिओ

googlenewsNext

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रिंकु झी टॉकिडटच्या कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स करणार आहे.

तिच्या या परफॉर्मन्सची झलक झी टॉकीजनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने रिंकू करणार प्रत्येकालाच घायाळ. रिंकूच्या या परफॉर्मन्सच्या तयारीची ही एक झलक. पाहायला विसरू नका 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' रविवार २८ जुलै, संध्या ६:३० वा. आपल्या झी टॉकीजवर.


काही दिवसांपूर्वी रिंकू 'मेकअप' सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. रिंकूने मेकअपसाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे.


रिंकू राजगुरूच्या मेकअप या आगामी चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे.


येत्या रविवारी झी टॉकीजवर आर्ची म्हणजेच रिंकू डान्स पहायला विसरू नका. 

Web Title: Archie aka Rinku Rajguru's dance performance video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.