"मराठी बोलायला लाज वाटते का?", असं म्हणणाऱ्यांना सई ताम्हणकरनं दिलं सडेतोड प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 20:54 IST2023-10-04T20:53:50+5:302023-10-04T20:54:17+5:30
Saie Tamhankar : सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती ट्रोलदेखील होते. मात्र याकडे ती दुर्लक्ष करताना दिसते. दरम्यान आता मराठी भाषेवरुन तिला ट्रोल केल्यामुळे तिने याला प्रत्युत्तर दिले आहे.

"मराठी बोलायला लाज वाटते का?", असं म्हणणाऱ्यांना सई ताम्हणकरनं दिलं सडेतोड प्रत्युत्तर
मराठी सिनेइंडस्ट्रीतील परमसुंदरी म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) हिने मराठीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती ट्रोलदेखील होते. मात्र याकडे ती दुर्लक्ष करताना दिसते. दरम्यान आता मराठी भाषेवरुन तिला ट्रोल केल्यामुळे तिने याला प्रत्युत्तर दिले आहे.
नुकतेच सईने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. नुकतेच तिने एका इंग्रजी युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रश्नांना इंग्रजीत उत्तरं दिली. हे तिच्या काही चाहत्यांना खटकलं आणि ती मराठीत न बोलल्यामुळे ट्रोल करण्यात आले. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मराठीत सांगितले असते तर पूर्ण समजले असते, इंग्रजी + मराठी = आमची गोची झाली बघा. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, मराठीमध्ये बोलले असते तर काय झाले असते, आपल्या भाषेत बोलायला लाज वाटते?
सई ट्रोलर्सना उत्तर देताना म्हणाली...
त्यावर सई म्हणाली की, हे एक इंग्रजी चॅनेल आहे. तुम्ही आधी नीट माहिती मिळवा, त्यानंतर बोला. आम्ही कोणत्या भाषेत बोलायचं हे ठरवण्याचा हक्क तुम्हाला नाही. तिच्या या उत्तरामुळे ट्रोलर्सना चांगलंच प्रत्युत्तर मिळाले आहे.