कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 11:54 AM2019-02-05T11:54:31+5:302019-02-05T12:10:37+5:30

रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

Artist got emotional share condolences on social media for ramesh bhatkar | कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली

कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली

googlenewsNext
ठळक मुद्दे रमेश भाटकर यांनी छोट्या पडद्यावर पोलिसांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष पसंतीस पडल्या होत्या रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता

रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. श्रेया बुगडे हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर रेमश भाटकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन we will all miss u Ramesh kaka असे कॅप्शन दिले आहे.

 

श्रेयासोबतच सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरेने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


गत सोमवारी रमेश भाटकर यांनी मुंबईतल्या एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये(नेपेन्सी रोड) अखेरचा श्वास घेतला. रमेश भाटकर यांनी छोट्या पडद्यावर पोलिसांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष पसंतीस पडल्या होत्या. तसेच हेलो इन्स्पेक्टर, कमांडर, तिसरा डोळा, हद्दपार, दामिनी', बंदिनी व युगांधरा या मालिकेत त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या. १९७७ ला 'चांदोबा चांदोबा भागलास का' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. गेल्याच वर्षी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.   

Web Title: Artist got emotional share condolences on social media for ramesh bhatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.