रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर लाँच,असा दिसला कलाकारांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 08:40 AM2018-01-18T08:40:39+5:302018-01-18T14:10:39+5:30

‘जंगल गाणं कधी ऐकलय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी 'राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज ...

The artist's looks like the launch of a teaser of the mysterious 'monster' | रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर लाँच,असा दिसला कलाकारांचा अंदाज

रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर लाँच,असा दिसला कलाकारांचा अंदाज

googlenewsNext
ंगल गाणं कधी ऐकलय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी 'राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज लाँच करण्यात आला आहे. 'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती आता या टीजर मुळे आणखी वाढली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे.या टीजर मधून ‘राक्षस’ ही आदिवासी, जंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे."जंगल गाणं गातं, ते हसतं – रडतं  त्याला भावना असतात" असे यात म्हटले आहे तर दुसरीकडे एक मुलगी आपल्या आईला म्हणतेय ‘आई,बाबांना जंगलातल्या राक्षसाने गिळलंय’. या संवादामुळे गूढ वाढलेल्या ‘राक्षस’ मध्ये नक्की काय रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

दरम्यान,‘राक्षस’ चित्रपटात शरद केळकर, साई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर आदींच्या भूमिका आहेत.घनदाट, किर्रर अशा जंगलात नक्की काय घडलं आहे? आणि या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं 'राक्षस'च लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत.समित कक्कड यांनी आतापर्यंत एकाहून एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे.निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून समित कक्कड यांचा 'आयना का बायना' हा पहिला चित्रपट असून तो सोनी मॅक्ससाठी हिंदीत डब होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. शिवाय 'हाफ तिकीट' हा समित कक्कड यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट असून १५ निरनिराळ्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स' मध्ये या चित्रपटाची निवड झाली होती 

Web Title: The artist's looks like the launch of a teaser of the mysterious 'monster'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.