कलाकारांनी दिल्या भूषणला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 06:21 PM2016-11-25T18:21:53+5:302016-11-25T18:21:53+5:30

भूषणला शुभेच्छा दयायला तो लग्न वगैरे करतो का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल हे नक्की. त्याचबरोबर काही तरूणींचे ...

Artists Wish Happy Bhushan | कलाकारांनी दिल्या भूषणला शुभेच्छा

कलाकारांनी दिल्या भूषणला शुभेच्छा

googlenewsNext
षणला शुभेच्छा दयायला तो लग्न वगैरे करतो का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल हे नक्की. त्याचबरोबर काही तरूणींचे मनदेखील तुटले असेल. पण त्याच्या चाहत्यांना सांगावेसे वाटते की, घाबरू नका, भूषण लग्न वगैरे करत नाही तर त्याचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सर्वच मराठी कलाकार त्याला सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनीदेखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याचे फोटोदेखील अपलोड केले आहेत. एवढेच नाही तर एका चाहत्याने चक्क त्याचा लहानपणाचा फोटो अपलोड करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भूषणच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी आज सोशलमीडिया रंगून गेली आहे. संस्कृती बालगुडे, प्रिया मराठे अशा अनेक कलाकारांनी भूषणला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर भूषणनेदेखील आजचा दिवस काहीसा खास म्हणत, सोशल मिडीयावर लहापणीचा एक पोझ देवून काढलेला फोटो आणि त्याचबरोबर त्याच सेम पोझचा फोटो काढून त्याने सोशलमिडीयावर अपलोड केला आहे.  नेहमी मोठयाने हसा, आपल्या भावभावना इतरांशी शेअर करा म्हणत किती ही वय झाले तरी बालपण कधीच विसरू शकत नाही अशा भावनादेखील त्याने सोशलमिडीयावर व्यक्त केल्या आहेत. भूषणसाठी आजचा दिवस हा नक्कीच खास ठरला आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनी व सहकलाकारांनी सोशलमिडीयावर शुभेच्छा देत त्याच्या आनंदाला चार चाँद लावले आहे. यापूर्वी भूषण हा टाइमपास २, कॉफी अ‍ॅण्ड बरचं काही, मिसमॅच, कलाकार असे अनेक चित्रपट केले आहेत. त्याचबरोबर पिंजरा मालिकेतूनदेखील तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 

Web Title: Artists Wish Happy Bhushan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.