अरुण नलावडे आणि शशांक शेंडे यांची निरामय जुगलबंदी 'हॅपी बर्थ डे' सिनेमातून !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 06:42 AM2017-11-15T06:42:59+5:302017-11-15T12:12:59+5:30
कोणताही चित्रपट बनवताना त्याची तांत्रिक अंग उत्तम असण्याची गरज असते. त्याचप्रमाणे अजून एक अतिशय महत्वाचा घटक असतो तो म्हणजे ...
क णताही चित्रपट बनवताना त्याची तांत्रिक अंग उत्तम असण्याची गरज असते. त्याचप्रमाणे अजून एक अतिशय महत्वाचा घटक असतो तो म्हणजे उत्तम कलाकार जे दिग्दर्शकांचे व्हिजन पडद्यावर तंतोतंत उतरवतात. हा दुग्धशर्करा योग् जुळून आलाय मुकुलिना चित्र आणि रेड स्मिथ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिलीप कोलते यांची निर्मिती असलेल्या 'हॅपी बर्थ डे' चित्रपटातून. थॅलॅसेमिआ आजाराने ग्रस्त एका षोडशवर्षीय मुलाची ही कथा असून याचं दिग्दर्शन केलंय नारायण गोंडाळ यांनी. चित्रपटात 'रिंगण' फेम शशांक शेंडे व 'श्वास' फेम अरुण नलावडे महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसणार आहेत.
अरुण नलावडे 'श्वास' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे सह निर्माते होते व त्यात त्यांनी मध्यवर्ती भूमिकाही केली होती. नाटक-चित्रपट-मालिका या तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंय्रामुग्ध करणारे अरुण नलावडे प्रथमच प्रचंड ताकदीचे अभिनेते शशांक शेंडे यांच्याबरोबर एकाच चित्रपटातून दिसणार आहेत. शशांक शेंडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'रिंगण' राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा आहे तसंच त्यांनी अभिनय केलेल्या 'ख्वाडा' ला ही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांतून कार्यरत असणारे शशांक शेंडे आपल्या वास्तववादी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत.
असे हे दोन दिग्गज कलाकार, अरुण नलावडे आणि शशांक शेंडे, यांची निरामय जुगलबंदी 'हॅपी बर्थ डे' सिनेमातून अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
काही महिन्यांपूर्वी अरुण नलावडे ताटवा चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमाची कथा गुंफली होती. या चित्रपटाची कथा शिल्पा या पाथरवट समाजातील मुलीच्या जीवनावर आधार होती. श्रीपाद भोळे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होतीय या चित्रपटातील गीतांना संगीतकार अतुल जोशी, प्रशांत फासगे यांनी संगीत दिले असून गायक केवल वाळंज, सावनी रवींद्र, योगिता गोडबोले, अतुल जोशी, प्रसाद शुक्ल यांनी ही गाणी गायली होती.