आशा काळे आणि मधू कांबीकर ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 07:34 AM2018-03-16T07:34:23+5:302018-03-16T13:04:23+5:30

गेली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या ‘आशाताई काळे’ आणि ‘मधू कांबीकर’ यांना यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या ...

Asha Kale and Madhu Kambikar honored the 'Jeevan Gaurav' award | आशा काळे आणि मधू कांबीकर ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या मानकरी

आशा काळे आणि मधू कांबीकर ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या मानकरी

googlenewsNext
ली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या ‘आशाताई काळे’ आणि ‘मधू कांबीकर’ यांना यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.तब्येत ठीक नसल्याने मधू कांबीकर येऊ शकल्या नाहीत.त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या सुनेने स्वीकारला.पुरस्कार स्वीकारताना त्या खूप भावुक झाल्या.“आजही जेव्हा चॅनेवर 'शापित', 'एक होता विदूषक' सारखा एखादा चित्रपट दाखवला जातो तेव्हा त्यासमोर त्यांना बसवले की, त्या काही रिअॅक्ट होतात. कलेशी समर्पणाची भावना असणे म्हणजे काय असते हे मी त्यांच्या रूपाने पाहतेय”, असे म्हणताच त्यांना अश्रू अनावर झाले.या सोहळ्यातील हा अतिशय भावूक क्षण ठरला. डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.आशा काळेही आपला पुरस्कार स्वीकारताना भावनाविवश झाल्या. सीमा देव यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. आशा काळे या वेळेस जुन्या आठवणीत रमल्या. त्या म्हणाल्या, कोल्हापुरात कॉलेजमध्ये असताना जयप्रभा स्टुडिओत आम्ही काही मैत्रिणी शूटिंग पाहायला गेलो होतो. 'वरदक्षिणा' या चित्रपटाचे चित्रीकरण तेव्हा सुरु होते आणि सीमा ताईंना काही मुली घट्ट पकडतात,असे दृश्य होते.मला अचानकच ही संधी मिळाली होती, तेव्हा सीमा ताईंचा घट्ट पकडलेला हात आजही मी तसाच धरून आहे. त्यांच्यासोबत मी चित्रपटातून एकत्र काम करू शकले नाही पण नाटकातून मात्र आम्ही एकत्र काम केले, दौरे केले. माझे यश माझ्या एकटीच नसून माझे सगळेच निर्माता-दिग्दर्शक, सहकलाकार, तंत्रज्ञ असे या सगळ्यांचे आहे. त्या सर्वांचेच मी आज आभार मानते, असे ही आशा काळे म्हणाल्या.या वेळेस दोघींच्याही कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. 

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.तर उमेश कामत - स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव - पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे - प्राजक्ता माळी यांच्या डान्स परफॉर्मन्सने या सोहळ्यात बहार आणली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि मधू कांबीकर यांना या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मराठी पाऊल पडते हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे दिग्दर्शक अमित मसुरकर यांना देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात हम्पी आणि कच्चा लिंबू या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले. सचिन खेडेकर यांना बापजन्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर सोनाली कुलकर्णीला कच्चा लिंबूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.मुरांबा हा या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 

Web Title: Asha Kale and Madhu Kambikar honored the 'Jeevan Gaurav' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.