'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूडची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 03:03 PM2020-01-29T15:03:13+5:302020-01-29T15:04:22+5:30

Ashi Hi Banwa Banwi Movie : लग्नाच्या जेमतेम ५ वर्षांनंतर सिद्धार्थ रेचं अचानक निधन झालं.

Ashi Hi Banvabanvi fame Siddharth Ray passed away at age of 41, his wife is bollywood actress | 'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूडची अभिनेत्री

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूडची अभिनेत्री

googlenewsNext

अशी ही बनवा बनवी चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज या चित्रपटाने तीस वर्षे उलटली असली तरी आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या सिनेमामधील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांना चांगलेच लक्षात आहे. अगदी अशोक सराफ यांच्यापासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्यापासून अश्विनी भावेंपर्यंत सगळ्यांनीच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.


या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आणखीन एका व्यक्तीने रसिकांच्या मनावर छाप उमटविली होती. हा अभिनेता म्हणजे शंतनू माने. अशोक सराफ यांच्या म्हणजेच धनंजय मानेच्या भावाची भूमिका साकारली होती सिद्धार्थ रेने.


सिद्धार्थने १९७७ मध्ये आलेल्या ‘चानी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. १९८० मध्ये आलेल्या ‘थोडीशी बेवफाई’ ह्या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. या चित्रपटात त्याला पद्मिनी कोल्हापुरे ह्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 


त्याने ९० च्या दशकात काही हिंदी चित्रपटात कामे केली. ‘पनाह’, ‘तिलक’, ‘गंगा का वचन’ ह्यासारख्या चित्रपटात त्याने कामे केली. परंतु मनी रत्नम ह्यांच्या ‘वंश’ चित्रपटात त्याला विशेष भूमिका मिळाली. त्यानंतर तो बॉलिवूडकरांच्या खरा लक्षात राहिला तो ‘बाजीगर’ चित्रपटामुळे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरला होता. त्याने शाहरुख खान सोबत सहाय्यक कलाकाराची भूमिका निभावली होती. त्या चित्रपटातले सिद्धार्थवर शूट केलेले ‘छुपाना भी नही आता’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. 


त्याने १९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला होता. शांतिप्रिया हिने अनेक तामिळ आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारचा सौगंध ह्या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया अभिनेत्री होती. ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया हिची छोटी बहीण आहे. 


लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असतील अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सुशांतचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव शिष्या आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर शांतिप्रियाने चित्रपटात काम करणे खूप कमी केले होते. परंतु आता काही काळ गेल्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे. आता ती हिंदी मालिंकमध्ये काम करते. 

Web Title: Ashi Hi Banvabanvi fame Siddharth Ray passed away at age of 41, his wife is bollywood actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.