अशी ही बनवाबनवीमधील शंतनूचे खूपच कमी वयात झाले निधन, हिंदीमध्येही केले होते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 14:57 IST2021-02-20T14:55:35+5:302021-02-20T14:57:06+5:30

सुशांतचे २००४ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. तो त्यावेळी केवळ ४० वर्षांचा होता. त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांच्या मुलांचा सांभाळ ती एकटीने करते.

Ashi Hi Banwa Banwi fame shantanu aka siddharth ray died in early age | अशी ही बनवाबनवीमधील शंतनूचे खूपच कमी वयात झाले निधन, हिंदीमध्येही केले होते काम

अशी ही बनवाबनवीमधील शंतनूचे खूपच कमी वयात झाले निधन, हिंदीमध्येही केले होते काम

ठळक मुद्देसिद्धार्थची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अक्षय कुमारसोबत देखील काम केले आहे. अक्षयच्या सौंगध या पहिल्या चित्रपटामध्ये शांतिप्रिया नायिका होती.

सिद्धार्थ रे ने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता अशी ही बनवाबनवी या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली शंतनूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

सिद्धार्थचे खरे नाव सुशांत रे असून तो व्ही शांताराम यांचा नातू होता. वंश, पहचान, युद्धपथ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले नसल्याने त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या तितक्याशा लक्षात राहिल्या नाहीत. पण त्याचा बाजीगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात त्याने काजोलच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्याच्यावर चित्रीत झालेले छुपाना भी नही आता... हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.  तसेच आके तेरी बाहों में... हे प्रसिद्ध गाणे देखील त्याच्यावर चित्रीत झाले होते. सुशांतचे २००४ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. तो त्यावेळी केवळ ४० वर्षांचा होता. चरस हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

सिद्धार्थची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अक्षय कुमारसोबत देखील काम केले आहे. अक्षयच्या सौंगध या पहिल्या चित्रपटामध्ये शांतिप्रिया नायिका होती. शांतिप्रिया ही प्रसिद्ध अभिनेत्री असून ती गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. १९९९ मध्ये सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांनी लग्न केले. त्या दोघांना दोन मुले देखील आहेत. लग्नाच्या पाचच वर्षांत सिद्धार्थचा मृत्यू झाला. 

शांतिप्रियाने माता की चौकी-कलयुग में भक्ती की शक्ती आणि द्वारकादिश भगवान श्रीकृष्णा यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या शांतिप्रिया तिच्या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ करत आहे. शांतिप्रिया दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची छोटी बहीण आहे.

Web Title: Ashi Hi Banwa Banwi fame shantanu aka siddharth ray died in early age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.