अशनूर कौरचा मराठीत जलवा, सोशल मी़डियावर गाण्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 15:23 IST2019-11-06T15:14:24+5:302019-11-06T15:23:43+5:30
हिंदीतल्या मालिका व चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर ‘पटियाला बेब्स' फेम अभिनेत्री अशनूर कौर आता मराठीत झळकली आहे

अशनूर कौरचा मराठीत जलवा, सोशल मी़डियावर गाण्याची चर्चा
हिंदीतल्या मालिका व चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर ‘पटियाला बेब्स' फेम अभिनेत्री अशनूर कौर आता मराठीत झळकली आहे. सोशल माध्यमावर ट्रेंडिंग असलेला अशनूर कौर हा युवा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजाने अनेक गीतांची मैफिल सजविणाऱ्या शोभना गुदगे या दोघींचा मस्तीभरा अंदाज ‘स्वाग सलामत’ या अल्बम मध्ये पहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्वाग सलामत’ या गाण्याने दोनच दिवसांत ८ लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. तरुणाईला या गाण्याचा अनोखा अंदाज पसंतीस पडला आहे.
असे धमाल मस्तीने पुरेपूर असलेल्या या गाण्याचे बोल कौस्तुभ पंत याने लिहिले असून संगीतकार अमितराज यांचा संगीतसाज या गाण्याला लाभला आहे. व्हिडीओ पॅलेस व पायोनीर प्रोडक्शनच्या सुरेंद्र गुदगे यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होलदार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन उदयसिंग मोहिते यांचे तर व्हिडिओ दिग्दर्शन कैलाश पवार यांचे आहे. कलादिग्दर्शन रवी लेले तर वेशभूषा प्राजक्ता गोरे हिची आहे.
गाण्यातून झळकणारा उत्साह अनेकांना ताल धरायला भाग पाडत असतो. ‘स्वाग सलामत’ या म्युझिकल अल्बमच्या माध्यमातून हा प्रयत्न आम्ही केला असून एक छानशी म्युझिक ट्रीट आम्ही प्रेक्षकांना दिली असल्याचे या दोघी सांगतात. धमाल, मस्तीने पुरेपूर हे ‘पार्टी सॉंग’ सगळे तुफान एन्जॉय करतायेत. ‘स्वाग सलामत’ चा अनोखा अंदाज आजच्या यंग ब्रिगेडसाठी स्पेशल ट्रीट ठरला आहे हे नक्की.