गोव्यातील या प्रसिद्ध मंदिरात झाले आहे अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 06:38 AM2018-02-22T06:38:45+5:302018-02-22T12:08:45+5:30
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांना अनिकेत हा मुलगा आहे. अनिकेत हा प्रसिद्ध ...
अ ोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांना अनिकेत हा मुलगा आहे. अनिकेत हा प्रसिद्ध शेफ असून युट्युबवर त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांच्यामध्ये १८ वर्षांचे अंतर आहेत. अशोक सराफ निवेदिता पेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म ६ जून १९६५ चा आहे. निवेदिता आणि अशोक यांच्यात चांगली मैत्री होती आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले.
निवेदिता आणि अशोक यांच्या लग्नाचा किस्सा खूपच छान आहे. निवेदिता आणि अशोक हे त्या काळातही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असल्याने ते मुंबईत लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी लग्न मुंबईत न करता गोव्यात केले होते. गोव्यात मंगेशीच्या देवळात त्या दोघांचे लग्न झाले. मंगेशी देवी अशोक सराफ यांची कुलदैवता असल्याने त्या दोघांनी गोव्याला जाऊन मंगेशीच्या देवळात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एका हिट चित्रपट दिले आहेत. हे तिघे खऱ्या आयुष्यातही खूप चांगले मित्र आहेत. सचिन आणि अशोक सराफ यांनी नुकतीच NO. 1 यारी विथ स्वप्निल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे तर अनेक वर्षं एकमेकांचे शेजारी देखील होते. अंधेरीतील आंबोली या परिसरातील एका इमारतीत हे दोघे एकमेकांच्या शेजारी शेजारी राहात होते. अनेक वर्षं अंबोलीमध्ये राहिल्यानंतर अशोक सराफ लोखंडवालाला तर लक्ष्मीकांत वर्सोवाला राहायला गेले.