सायली संजीवच्या घरी आल्या निवेदिता सराफ; फोटो पोस्ट करत म्हणाल्या, 'लेकीकडचं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 04:59 PM2024-09-16T16:59:45+5:302024-09-16T17:00:19+5:30

निवेदिता सराफ यांनी सायलीच्या घरातील फोटो शेअर केला आहे. तसंच त्यांच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.

Ashok Saraf and Nivedita Saraf took ganpati darshan at Sayali Sanjeev s home | सायली संजीवच्या घरी आल्या निवेदिता सराफ; फोटो पोस्ट करत म्हणाल्या, 'लेकीकडचं...'

सायली संजीवच्या घरी आल्या निवेदिता सराफ; फोटो पोस्ट करत म्हणाल्या, 'लेकीकडचं...'

अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) मुंबईतील घरी यंदा गणपती बाप्पा विराजमान झाला. तसंच गौरीचंही आगमन झालं. सायलीने तिच्या घरातील गौरी गणपतीची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. तसंच पारंपरिक साडी नेसून सायली सुंदर नटली होती. आता नुकतंच निवेदिता सराफ यांनी सायलीच्या घरातील फोटो शेअर केला आहे. तसंच त्यांच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.

अशोक सराफ (Ashok Saraf)आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही प्रेक्षकांची लाडकी जोडी. या जोडीने नुकतंच सायली संजीवच्या घरी जात बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांनी सायलीसोबत छानसा फोटोही काढला. यासोबत निवेदिता सराफ यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, 'लेकीकडचं गणपती दर्शन'. त्यांच्या या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं.


अशोक सराफ आणि निवेदिता सराफ सायलीला आपली लेकच मानतात. त्यांना मुलगी नाही. तसंच सायली अगदी निवेदिता यांच्यासारखीच दिसते असं अनेकांना वाटतं. त्यामुळे त्यांनी सायलीला आपली लेकच मानलं आहे. बऱ्याचदा अशोक सराफ यांनी सायलीचा उल्लेख माझी लेक असा केला आहे. तर यावेळी निवेदिता सराफ यांनी हे कॅप्शन दिलं आहे. 'तुम्ही माझ्या आयुष्यात आहात हा मला मिळालेला आशीर्वादच आहे. आय लव्ह यू' अशी कमेंट सायलीने केली आहे. 

चाहत्यांनी कमेंट करत यावर सहमती दर्शवली आहे. 'सायली खरंच तुमची मुलगी वाटते','जी नाती रक्ताने मिळत नाहीत ती नाती आपोआप आपल्या चांगल्या गुणांनी मिळून जातात. अशोक मामांना मुलगी नाही पण ती जागा तू भरुन काढलीस' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

Web Title: Ashok Saraf and Nivedita Saraf took ganpati darshan at Sayali Sanjeev s home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.