अशोक सराफ यांचा हा किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘मामा खरंच तुम्ही ग्रेट आहात!’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:11 PM2021-09-13T17:11:29+5:302021-09-13T17:14:56+5:30

 तर हा किस्सा आहे, ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाच्या तालमीदरम्यानचा. किस्सा तसा जुना आहे. पण...

Ashok Saraf: Interesting AND untold incident about the actor | अशोक सराफ यांचा हा किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘मामा खरंच तुम्ही ग्रेट आहात!’

अशोक सराफ यांचा हा किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, ‘मामा खरंच तुम्ही ग्रेट आहात!’

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाची तालीम शेवटच्या टप्प्यात होती. अशोक सराफही तालमीला रोज न चुकता हजर होतं. एकदिवस मात्र ते काहीसे अस्वस्थ दिसू लागले.

अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी चित्रपटसृृष्टीतील एक मोठं नाव. इतक्या वर्षांपासून अशोक सराफ  सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.  अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या अशोक मामा यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. बॉलिवूडमध्येही त्यांनी काही सिनेमे केलेत. चित्रपटसृष्टीत मामा या नावानं ओळखल्या जाणारे अशोक सराफ केवळ एक संवेदनशील अभिनेते नाहीत तर तितकेच संवेदनशील व्यक्तीही आहेत. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, असा विचार करणारे फार कमी लोक असतात. अशोक सराफ यापैकीच एक. त्यांचा हा किस्सा वाचून तुम्हालाही याचा अंदाज येईल.

तर हा किस्सा आहे, ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाच्या तालमीदरम्यानचा. किस्सा तसा जुना आहे. पण सर्वांचे आवडते अशोक मामा किती संवेदनशील आहेत, व्यक्ति म्हणून किती महान आहेत, हे यावरून तुमच्या लक्षात येईल.
 ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाची तालीम शेवटच्या टप्प्यात होती. अशोक सराफही तालमीला रोज न चुकता हजर होतं. आपल्या सहकलाकारांसोबत तालमीत भाग घेत. एकदिवस मात्र ते काहीसे अस्वस्थ दिसू लागले. तालमीत त्यांचं लक्ष लागेना. नाटकाचा  दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर याच्या नजरेतून मामांची अस्वस्थता कशी लपणार? तो लगेच अशोक मामांकडे गेला आणि त्याने कारण विचारलं. पण अशोक मामांनी हसत हसत गोष्ट टाळली आणि त्या दिवशीची तालीम त्यांनी कशीबशी पूर्ण केली. चिन्मय शांत बसणा-यांपैकी नव्हताच. त्यानं अशोक मामांच्या ड्रायव्हरला गाठलं, तेव्हाकुठं चिन्मयला सगळं काही कळलं. मामांची मान लागली होती आणि त्यांना अस' वेदना होत होत्या. ड्रायव्हरनं सगळं सांगितलं. अशोक मामांना नेहमी असा त्रास होतो. म्हणून ते आपल्या सोबत एक बाम ठेवतात, असंही ड्रायव्हरनं सांगितलं. पण तालमीदरम्यान मामांनी एकदाही बाम वापरलं नव्हतं.
चिन्मयनं  याबद्दल अशोक मामांना विचारलं आणि त्यांनी दिलेलं कारण ऐकून तोही थक्क झाला.

‘ हो, मान दुखतेय. बाम आहे. पण मी मुद्दाम तो वापरला नाही. त्याचा वास खूप उग्र आहेत. मी तो वापरला तर तालीम करणाºया सर्वांनाच तो वास सहन करावा लागेल. त्यांना मला विनाकारण त्रास द्यायचा नव्हता. म्हणून मी बाम वापरला नाही,’ असं अशोक मामांनी सांगितलं. त्यांचं ते कारण ऐकून चिन्मय थक्क झाला. सर्व कलाकारही थक्क झालेत. स्वत:पेक्षा इतरांचा विचार करणारा ग्रेट मामांचं दर्शन त्यादिवशी सर्वांना झालं होतं.

Web Title: Ashok Saraf: Interesting AND untold incident about the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.