"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 02:40 PM2024-07-15T14:40:09+5:302024-07-15T14:40:43+5:30

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी असणाऱ्या 'लाईफलाईन' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (lifeline)

ashok saraf madhav abhyankar lifeline movie teaser release | "पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

मराठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन विषयांवरील सिनेमे रिलीज होणार आहेत. यापैकी एक महत्वाचा सिनेमा म्हणजे 'लाईफलाईन' . मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाईफलाईन' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही चुरस रंगणार आहे.

'लाईफलाईन' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात आता या टिझरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. अशोक सराफ आणि माधयव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे, पाहाण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह  हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर  यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट 'लाईफलाईन'चे निर्माते आहेत.  २ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, "आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज या चित्रपटाला लाभले आहेत. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ‘लाईफलाईन’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिने-सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे.''

Web Title: ashok saraf madhav abhyankar lifeline movie teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.