Ashok Saraf : सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं? अशोक सराफ म्हणतात…

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 03:25 PM2024-07-31T15:25:02+5:302024-07-31T15:51:53+5:30

सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं, याबद्दल अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली.

Ashok Saraf On Social Media Viral Memes talks about his upcoming film Lifeline | Ashok Saraf : सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं? अशोक सराफ म्हणतात…

Ashok Saraf : सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं? अशोक सराफ म्हणतात…

Ashok Saraf On Social Media Viral Memes : मराठी सिनेसृष्टीचे लाडके मामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf). त्यांची  प्रसिद्ध आजही कायम आहे. अशोक सराफ यांच्या आयकॉनिक सिनेमांचे डायलॉग कायम प्रेक्षकांच्या तोंडात असतात. सोशल मीडियावर तर त्यांच्या सिनेमातील डायलॉग, डान्सचे भन्नाट मिम्स चांगलेच व्हायरल होत असतात. हे मीम्स पाहून काय वाटतं, हे खुद्द अशोक सराफ यांनीचं सांगितलं आहे.  व्हायरल मीम्स ( Viral Memes) आणि सोशल मीडियाच्या (Social Media) बाबतीत आपण भाग्यवान असल्याचं त्यांनी म्हटलं. 

अशोक सराफ यांनी नुकतेच 'मित्र म्हणे' या पॉडकास्टवर त्यांनी एक मुलाखत दिली. 'सोशल मीडियावर तुम्ही एव्हरग्रीन आहात, तुमच्या मागे तरुण पीढी धावते, त्याबद्दल काय वाटतं',  असं विचारण्यात आलं. यावर अशोक सराफ म्हणाले, 'मला वाटतं हे दोन गोष्टींवर  अवलंबून असतं. तुम्ही जे काम करताय, त्या कलेप्रती तुम्ही किती प्रामाणिक आहात. यावरुन तुमच्या कलेची एक लेवल ठरते. ती लेवल जर लोकांना आवडली. तर मग त्या लोकांसोबत तुम्ही कसे वागता ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे'.

पुढे ते म्हणाले, 'जे माझे चाहते आहेत. मला भेटायला येतात. त्यांच्याशी मी नेहमीच चांगलं बोलतो. कारण, मला कुणाचा अपमान करायला जमत नाही. जे माझे चाहते आहेत. ते उगाच नाहीत. ते मिळवण्यासाठी कित्येक वर्ष लोक धडपडतात. ते मला देवाच्या दयेने मिळाले आहेत. ते मी का सोडेन. मी उगाच का त्याच्याशी वाकडे-तिकडे बोलले. का मी त्यांचा अपमान करेल. यामुळे त्यांच्यामध्ये मी प्रसिद्ध आहे. जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं जर मला नमस्कार केला तर मीही त्यांना अभिवादन करतो'. 

सोशल मीडिया आणि मीम्सवर अशोक सराफ म्हणाले, 'ही सगळी लोकांची कृपा आहे. हे सगळं लोक करतात. अर्थात ते मला आवडतं, जे ते करतात. त्यांचा दृष्ट्रीकोनाची मला कल्पना येते. किती हुशार लोकं आहेत . एडिट करुन ते बरोबर जोडतात. माझा एक डान्स आहे, तो इंग्रजी गाण्यावर त्यांनी एडिट केलाय. दाक्षिणात्य गाण्यावरपण ते एडिट केलं आहे. दाक्षिणात्य लोकांना ते पटतं. कारण आपला चेहराच तसा दिसतो. सोशल मीडियाच्याबाबतीत मी लकी आहे. कारण, त्यांना माझ्यावर करायला आवडतं. माझ्या दृष्ट्रीने ही भाग्याची गोष्ट आहे. हे सर्व पाहून मी काहीतरी मिळवलं आहे, असं मला वाटतं'. 


अशोक सराफांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच त्यांचा 'लाईफलाईन' सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात त्यांचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळा अंदाज पाहायला मिळतोय. यासोबत अशोक सराफ हे लवकरच  'नवरा माझा नवसाचा २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण, 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये मात्र मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ते लालू कंडक्टर नव्हे तर टीसी(Ticket Checker) च्या भूमिकेत दिसणार आहेत. २० सप्टेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Ashok Saraf On Social Media Viral Memes talks about his upcoming film Lifeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.