​ शेन्टीमेन्टलमध्ये अशोक सराफ दिसणार कॉपच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2016 01:19 PM2016-12-11T13:19:14+5:302016-12-11T13:19:14+5:30

प्रेक्षकांना आपल्या विनोदी शैलीच्या अलग अंदाजाने खळखळून हसायला लावणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ लवकरच एका मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पहायला ...

Ashok Saraf plays the role of cop in the commercial | ​ शेन्टीमेन्टलमध्ये अशोक सराफ दिसणार कॉपच्या भूमिकेत

​ शेन्टीमेन्टलमध्ये अशोक सराफ दिसणार कॉपच्या भूमिकेत

googlenewsNext
रेक्षकांना आपल्या विनोदी शैलीच्या अलग अंदाजाने खळखळून हसायला लावणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ लवकरच एका मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. शेन्टीमेन्टल या मराठी चित्रपटामध्ये अशोक सराफ आपल्याला एकदम डॅशिंग अंदाजात दिसणार आहेत. या सिनेमामध्ये अशोकजी कॉप च्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे. बºयाच दिवसांमध्ये अशोक सराफ प्रेक्षकांना मोठ्या पडदयावर दमदार भूमिकेत काही पहायाला मिळाले नाहीत. सिंघम या चित्रपटामध्ये पोलिस हवालदारच्या भूमिकेत अशोक सराफ यांनी अफलातून काम केले होते. आता पुन्हा एकदा ते मराठी चित्रपटामध्ये एकदम तडफदार भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक समीर पाटील दिग्दर्शीत करणार असल्याचे कळतेय. अशोक सराफ यांनी याआधी देखील पांडु हवालदार या मराठी चित्रपटामध्ये एकदम हटके पांडू हवालदारची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडुन कौतुक देखील केले गेले होते. एवढेच नाही तर या चित्रपटातील त्यांच्या हवालदाराच्या भूमिकेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला होता. अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पोलिसाची भूमिका चित्रपटामध्ये साकारणे माझ्यासाठी लकी आहे असेच मी समजतो. आता पुन्हा एकदा तब्बल चाळीस वर्षांनंतर मला मराठी चित्रपटामध्ये अशीच भूमिका साकारायला मिळत आहे. खरंच आहे म्हणा अशोकजींच्या दर्जेदार अभिनयाने कोणतीही भूमिका पडदयावर अगदी जिवंत हाते यात काही शंकाच नाही. आता ते या आगामी चित्रपटात कशाप्रकारचा कॉप साकारणार हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे.

Web Title: Ashok Saraf plays the role of cop in the commercial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.