अशोक सराफ साकारणार पहिल्यांदाच ही भूमिका, म्हणाले - या क्षेत्राबद्दल प्रचंड आदर आहे आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 01:03 PM2024-07-03T13:03:03+5:302024-07-03T13:03:44+5:30

Ashok Saraf : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ते लाईफलाईन या सिनेमात दिसणार आहेत.

Ashok Saraf will play this role for the first time, said - There is great respect for this sector and... | अशोक सराफ साकारणार पहिल्यांदाच ही भूमिका, म्हणाले - या क्षेत्राबद्दल प्रचंड आदर आहे आणि...

अशोक सराफ साकारणार पहिल्यांदाच ही भूमिका, म्हणाले - या क्षेत्राबद्दल प्रचंड आदर आहे आणि...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ते लाईफलाईन या सिनेमात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच डॉक्टरची भूमिका साकारणात आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 

 जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित 'लाईफलाईन' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल अशोक सराफ म्हणाले, आज या प्रख्यात डॉक्टरांसोबत हा दिवस साजरा करता आला, हे मी माझे सौभाग्य मानतो. माझ्या आगामी चित्रपटामुळे मला हा क्षण अनुभवता आला. ‘लाईफलाईन’ या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा या खास दिनानिमित्ताने समोर आली असून मी यात एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारत आहे.

मुळात या क्षेत्राबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे

मुळात या क्षेत्राबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि या चित्रपटामुळे हा आदर अधिकच वाढला आहे. ही भूमिका साकारताना मला डॉक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मियता, त्यांना करावा लागणारा विविध गोष्टींचा सामना, विरोध या सगळ्या गोष्टी मला या व्यक्तिरेखेमुळे अनुभवता आल्या. प्रत्येक गोष्टीमागे काही विज्ञान असते, हे रीतिरिवाजांमध्ये गुरफटलेल्यांना पटवून देणे किती जिकिरीचे काम आहे, हे मला या चित्रपटातून समजले, असे ते म्हणाले.

लाईफलाईन २ ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट. राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Ashok Saraf will play this role for the first time, said - There is great respect for this sector and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.