अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेंटिमेंटलचा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2017 10:03 AM2017-06-19T10:03:00+5:302017-06-19T15:33:00+5:30

अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेंटिमेंटलचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अशोक सराफ, रघुवीर यादव, उपेंद्र लिमये पाहायला मिळत आहेत.

Ashok Saraf's leading role is to launch a trailer launch | अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेंटिमेंटलचा ट्रेलर लाँच

अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेंटिमेंटलचा ट्रेलर लाँच

googlenewsNext
ीर पाटील दिग्दर्शित करत असलेल्या शेंटिमेंटल या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसापासून बरीच चर्चा आहे. समीर यांनी पोस्टर बॉईज आणि पोस्टर गर्ल असे दोन हिट चित्रपट बॉक्स ऑफिसला दिले आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीतील सुपरस्टार अशोक सराफ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात ते प्रल्हाद घोडके ही व्यक्तिरेखा साकारत असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच 4 जूनला या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अशोक सराफ आपल्याला पोलिसांच्या वर्दीत पाहायला मिळाले होते. या चित्रपटाचे पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. 
शेंटिमेंटल या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबतच उपेंद्र लिमये देखील प्रमुख भूमिकेत आहे आणि विशेष म्हणजे रघुवीर यादव या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अशोक सराफ, रघुवीर यादव, उपेंद्र लिमये पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये पोलिस खात्यात असल्याचे आपल्याला दिसत आहे. ते गुन्हेगाराचा पाठलाग करण्यासाठी बिहार गाठणार आहेत. त्यामुळे या चित्रपटात आपल्याला बिहारमधील काही ठिकाणे देखील पाहायला मिळणार आहेत. तसेच या ट्रेलरमध्ये आपल्याला एक आयटम साँग देखील पाहायला मिळत आहे. करप्ट अधिकारी आणि अट्टल गुन्हेगार मी एका नजरेत ओळखतो अशी संवादफेक करताना या ट्रेलरमध्ये अशोक सराफ आपल्याला दिसत आहेत.
अशोक सराफ यांचा हा चित्रपट 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ashok Saraf's leading role is to launch a trailer launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.