झाला बोभाटा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2017 02:56 PM2017-01-09T14:56:09+5:302017-01-09T14:57:26+5:30

अनुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मोठया प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे ...

The audience liked the Hilla Bobhta film | झाला बोभाटा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

झाला बोभाटा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

googlenewsNext
ुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मोठया प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील २०० चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहत असल्याचे दिसत आहे. झाला बोभाटा हा चित्रपट एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी तर अग्रेसरच म्हणा. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी. या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गावकरी पुन्हा एकत्र येतात, नेमकी काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटात मयुरेश पेम आणि मोनालिसा बागल हे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल. त्याचबरोबर या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, संग्राम साळवे, कमलेश सावंत, दिपाली अंबिकार या कलाकारांचादेखील समावेश आहे. किंग क्रिएशन आणि डीजी टेक्नो इंटरप्राईझेस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जेष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर हेदेखील हटक्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यांचा हटके लूकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 


 

Web Title: The audience liked the Hilla Bobhta film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.