'माधुरी’ चित्रपटातील ‘‘सॉरी’’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 08:00 AM2018-11-23T08:00:00+5:302018-11-23T08:00:00+5:30

सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका  तरुणीची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. सध्या तरुण पिढीवर अनेक चांगले आणि वाईट प्रकारचे प्रसंग उद्धभवतात, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले

The audience meeting with the song "Sorry" from 'Madhuri' movie | 'माधुरी’ चित्रपटातील ‘‘सॉरी’’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'माधुरी’ चित्रपटातील ‘‘सॉरी’’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्देमाधुरी' हा चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकणीर्ची प्रमुख भूमिका असलेल्या 'माधुरी' या चित्रपटाची पत्रकार परिषदेत सॉरी गाणं लाँच करण्यात आले. यावेळी निर्माते मोहसिन अख्तर, प्रस्तुतकर्ते उर्मिला मातोंडकर आणि शेखर माटे , संगीतकार अवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर, कलाकार सोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी, चित्रपटाचे लेखक समीर अरोरा आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांना या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका  तरुणीची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. सध्या तरुण पिढीवर अनेक चांगले आणि वाईट प्रकारचे प्रसंग उद्धभवतात, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले. तसेच सोनाली कुलकर्णी, शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली.तसेच पत्रकारांनी या ट्रेलरला पसंती दर्शवून चित्रपटाच्या टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटादरम्यान घडलेले अनेक चांगले वाईट प्रसंग पत्रकारांनी जाणून घेतले.

या पुण्यातील झालेल्या पत्रकार परिषदेत घडलेली आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील ‘‘सॉरी’’ हे गीत. पत्रकारांच्या उपस्थितीत हे गाणे प्रदर्शित  करण्यात  आले. या गाण्यासाठी  घेतलेली खास मेहनत आणि 'सॉरी' म्हणताना नेमक्या काय भावना मनात असतात हे गाण्यातून मांडतानाचा अनुभव याविषयी कलाकारांनी पत्रकारांसोबत गप्पा मारल्या.

मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. सोनाली कुलकर्णीचा हटके लुक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा 'माधुरी' हा चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
 
या प्रसंगी संवाद साधताना अवधूत म्हणाला, "मी स्वत: गायलेले किंवा मुझिक दिलेले गाणे कधीही प्रवासात ऐकत नाही. मात्र या चित्रपटातील गाणी मी प्रवासात ऐकत आहे. कारण ती मी स्वत: साठी बनविली आहेत असे मला वाटते. यामुळे प्रक्षेकांना दर्जेदार गाणी आणि संगीत अनुभवता येतील असे मला वाटते."

Web Title: The audience meeting with the song "Sorry" from 'Madhuri' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.