१२ व्या शतकात लिहीलेले 'गीत गोविंद' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 09:23 AM2017-12-20T09:23:46+5:302017-12-20T14:59:29+5:30

जयदेवांनी १२ व्या शतकात लिहलेल्या 'गीत गोविंद' ची मोहिनी शेकडो वर्ष लोकांना मोहित करत आहे. राधा आणि कृष्णाला जाणून ...

The audience of the song 'Geet Govind' written in the 12th century | १२ व्या शतकात लिहीलेले 'गीत गोविंद' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

१२ व्या शतकात लिहीलेले 'गीत गोविंद' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
देवांनी १२ व्या शतकात लिहलेल्या 'गीत गोविंद' ची मोहिनी शेकडो वर्ष लोकांना मोहित करत आहे. राधा आणि कृष्णाला जाणून घेण्यासाठी त्याच्या प्रेमामध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी नृत्यदर्पण घेऊन येत आहेत ‘गीतगोविंद’. पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या विद्यार्थिनी नृत्य दिग्दर्शिका संध्या दामले यांनी गीत गोविंद याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. संध्या दामले या ‘गीतगोविंद’ माध्यमातून एका वेगळा विचार आपल्या समोर घेऊन येत आहेत. 

‘गीत गोविंद’ च्या २ तासाच्या कार्यक्रमामध्ये १२ गाणी रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहेत. संगीत मार्तंड पंडित जसराज यांनी गाण्यांना साज दिला आहे. शंकर महादेव, अनुराधा पौडवाल, महालक्ष्मी अय्यर, आणि श्रेया घोषाल यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाणी अजरामर केली आहेत. राधा व कृष्णाची संपूर्ण कथा नृत्यामाधून  सादर होणार आहे. या वेळी लोकनृत्य विशारद श्रेयस देसाई, प्रियांका सकपाळ, अनुष्का साळवी, ईशा पेठे, नित्या रमेशकुमार, ज्ञानदा कडव, दिव्या रमेशकुमार, हे नर्तक आपल्या नृत्य कलेने सर्वाना मंत्रमुग्ध करतील.

राधा व कृष्ण देह धारण करून आले खरे पण त्यांचे नाते हे जीवात्मा व परमात्म्याचे आहे. यामध्ये राधा ही जीवात्मा आहे शुद्ध मनाने ती श्रीकृष्णाची भक्ती करते. राधा ही कृष्णाची शक्ती होती, पुरुष आणि शक्ती हे वेगळे कधी नव्हतेच आणि नाहीच, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण हाच भावार्थ आजच्या पिढीपर्यंत गीत गोविंद द्वारे पोहोचवायचा आहे. गीत गोविंद `सादर करताना कृष्ण भक्ती लोकांपर्यत पोहोचणे हा मुख्य उद्देश संध्या दामले यांचा आहे. कृष्णाच्या प्रत्येक लीले  मागे काही कारण नाही अर्थ असतो ही गोष्ट आपण यामधून पाहू शकतो.

Web Title: The audience of the song 'Geet Govind' written in the 12th century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.