अवधूत गुप्तेची मित्रांसोबत युके ट्रीप! फोटो शेअर करत म्हणाला, 'भावा, लै मज्जा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:54 PM2024-05-29T13:54:10+5:302024-05-29T13:54:39+5:30

अवधूतने युकेमध्ये नेमकं काय काय पाहिलं याची लिस्टच त्याने दिली आहे.

Avadhoot Gupte marathi music composer shares photos if his UK trip with friends | अवधूत गुप्तेची मित्रांसोबत युके ट्रीप! फोटो शेअर करत म्हणाला, 'भावा, लै मज्जा...'

अवधूत गुप्तेची मित्रांसोबत युके ट्रीप! फोटो शेअर करत म्हणाला, 'भावा, लै मज्जा...'

मराठमोळा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या इंग्लंडमध्ये एन्जॉय करत आहे. मित्रांसोबत तो या ट्रीपवर धमाल करताना दिसतोय. गायक स्वप्नील बांदोडकर, अजित परबसह तो युकेच्या रस्त्यांवर फिरताना दिसतोय. अवधूतने इन्स्टाग्राम पोस्ट करत त्याच्या युके ट्रीपची झलक दाखवली आहे. अवधूतने युकेमध्ये नेमकं काय काय पाहिलं याची लिस्टच त्याने दिली आहे.

अवधूत गुप्तेने युके ट्रीपचे फोटो शेअर करत लिहिले, "williamwordsworth चे घर... castleriggstonecircle ची भेट.. मित्रांसोबत millerandcarter मधे जेवण.. lakedistrict चा ड्राईव्ह. एकंदरीत UK ट्रीपला लै मज्जा आली भावा!"

अवधूतच्या या पोस्टवर गायिका वैशाली सामंतनेही कमेंट केली आहे. ती लिहिते, 'Worth आहे.' चाहत्यांनीही हार्ट इमोजी कमेंट करत अवधूतच्या पोस्टला दाद दिली आहे. अवधूत मित्रांसोबत नेहमी फिरत असतो. अवधूतनेही यामध्ये सेल्फीही शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या 'नाच गं घुमा' सिनेमाचं टायटल साँग अवधूत आणि वैशाली सामंतने गायलं जे तुफान गाजलं. अवधूतचं प्रत्येक गाणं हे काळजाला भिडणारं असतं आणि हिट होतं. 'सूर नवा ध्यास नवा' या गाण्याच्या कार्यक्रमातही तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो. 

Web Title: Avadhoot Gupte marathi music composer shares photos if his UK trip with friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.