अवधूत गुप्ते म्हणतो, 'गॅटमॅट होऊ देना'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 05:31 PM2018-10-15T17:31:43+5:302018-10-15T17:34:23+5:30

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते यांचे एक नवकोरे गाणे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झाले आहे.

Avadhoot Gupte says, "Gatmat Hou Dena" | अवधूत गुप्ते म्हणतो, 'गॅटमॅट होऊ देना'

अवधूत गुप्ते म्हणतो, 'गॅटमॅट होऊ देना'

googlenewsNext
ठळक मुद्दे'गॅटमॅट' सिनेमा १६ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते यांचे एक नवकोरे गाणे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झाले आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असे या गाण्याचे बोल असून, तरुणांचा आवाज अशी ख्याती मिरवणाऱ्या अवधुतच्या आवाजातील हे गाणे कॉलेज तरुणांना भुरळ पाडत आहे. 


युथला आपल्या तालावर थिरकवणारे हे रॉक गाणे आगामी 'गॅटमॅट' चित्रपटाचे शीर्षकगीत असून येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शिवाय, बऱ्याच वर्षानंतर अवधूत 'गॅटमॅट'च्या निमित्ताने ऑनस्क्रीन झळकणार असल्याकारणामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणे खऱ्या अर्थाने रॉकिंग ठरत आहे.  सचिन पाठक लिखित ‘गॅटमॅट होऊ देना’ या उडत्या लयीच्या गाण्याला समीर साप्तीस्करने चाल दिली आहे. अवधूतने ते त्याच्या 'स्टाईल'ने पडद्यामागे आणि पडद्यावरही गायले आहे. कॉलेज विश्वातील सळसळत्या तरुणाईला आकर्षित करणारे हे गाणे साऱ्यांनाच स्फूर्ती देऊन जाते. प्रेमाची गुलाबी छटा एका नव्या ढंगात मांडणारा 'गॅटमॅट' हा सिनेमा प्रेमी जोडप्यांसाठी खास असणार आहे.

अवधुत गुप्ते यांची प्रस्तुती आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केले आहे. तसेच राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून तरुणाईने बहरलेल्या या सिनेमात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठीतील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

Web Title: Avadhoot Gupte says, "Gatmat Hou Dena"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.