'अवांछित' सिनेमात रसिकांना घडणार कोलकातामधील नयनरम्य दर्शन, या कलाकारांच्या आहेत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 11:53 AM2019-11-04T11:53:29+5:302019-11-04T11:58:08+5:30

पन्नासहून अधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध बेंगॉली निर्माते प्रितम चौधरी हे 'अवांछित' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून त्यासोबतच बंगाली दिग्दर्शक शुभो बासु नाग यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Awanchit Marathi Movie Shotting Start In Kolkata | 'अवांछित' सिनेमात रसिकांना घडणार कोलकातामधील नयनरम्य दर्शन, या कलाकारांच्या आहेत भूमिका

'अवांछित' सिनेमात रसिकांना घडणार कोलकातामधील नयनरम्य दर्शन, या कलाकारांच्या आहेत भूमिका

googlenewsNext


पश्चिम बेंगॉलच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांना घालण्यासाठी दिग्दर्शक शुभो बासु नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा 'अवांछित' या मराठी चित्रपटाद्वारे सज्ज झाले असून त्यांच्या या चित्रपटाचं पहिलं चित्रीकरण सत्र नुकतचं पूर्ण झालं होत. येत्या ७ नोव्हेंबर पासून या चित्रपटाचं दुसरं चित्रीकरण सत्र कोलकाताच्या विस्तीर्ण सौंदर्य संपन्न विविध ठिकाणी सुरु होत आहे. उत्तर कोलकातामधील लाहाबाडीसह दक्षिण कोलकातामधील विविध कॅफेटेरिया आणि ऑलिगोमध्ये पहिल्या सत्रात चित्रीकरण झालं आहे. मराठी भाषेत तयार होणाऱ्या 'अवांछित' या चित्रपटाची सर्व लोकेशन्स चित्रपटाच्या कथेप्रमाणेच वैशिष्ट्येपूर्ण आहेत. कोलकातामधील डोळ्याचं पारणं फेडणारी विस्तीर्ण अशी बहुतांश सौंदर्यस्थळे प्रथमच मराठी प्रेक्षकांना वेड लावणार आहेत.

 

 किशोर कदम, मृणाल कुलकर्णी, अभय महाजन, मृण्मई गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण, सुलभा आर्य, राजेश शिंदे यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर या  प्रमुख बेंगॉली कलावंतांचाही अभिनय मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे.

 

या चित्रपटाच्या निमित्ताने बंगाली - मराठी कलावंत पडद्यावर व मागेही एकत्र काम करीत आहेत. पन्नासहून अधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध बेंगॉली निर्माते प्रितम चौधरी हे 'अवांछित' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून त्यासोबतच बंगाली दिग्दर्शक शुभो बासु नाग यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 'गणवेश' या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर अतुल जगदाळे हे या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसोबतच क्रिएटिव्ह प्रोडूयुसर बनले आहेत.

'अवांछित'मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते.

दिग्दर्शक शुभो बासु नाग यांच्या मूळ कथेवर 'अवांछित' बेतला असून त्यावर पटकथा व संवाद निर्मिती योगेश जोशी यांनी केली आहे. ओंकार कुलकर्णी यांनी रचलेल्या गीतांना संगीत व पार्श्वसंगीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते लोकप्रिय बंगाली संगीतकार अनुपम रॉय यांनी दिले आहे. त्यांचं हे संगीत मराठी रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या चित्रपसाठी विकी निर्माते प्रितम चौधरी यांच्यासोबत विकी शर्मा सहयोगी निर्माते असून अनु बासू हे प्रॉडक्शन डिझाईन करीत आहेत. त्यांच्या साथीनं अमित डे कलादिग्दर्शन करीत आहेत. वेशभूषाकार जयंती सेन यांनी स्टाईल व कॉश्च्युम डिझाईन करीत असून रंगभूषा प्रसेनजीत यांची आहे. या चित्रपटासाठी कार्यकारी निर्मिती डेबोलीन सेन पाहत असून प्रॉडक्शन मॅनेजर अरुण मन्ना आहेत.
 

Web Title: Awanchit Marathi Movie Shotting Start In Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.