अ. ब. क चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 10:10 AM2018-03-19T10:10:02+5:302018-03-19T15:40:02+5:30

                             ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ या ...

A B. Prime Minister Narendra Modi gave the voice to the film | अ. ब. क चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवाज

अ. ब. क चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आवाज

googlenewsNext
 
                         ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ या विषयावर थेट भाष्य करणाऱ्या अ.ब.क चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाज दिला असून चित्रपटाचा मुख्य नायक मोदीजींच्या बहुचर्चित रेडीओवरील ‘मन कि बात’ या कार्यक्रमातून कशी प्रेरणा घेतो. या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आले असून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी चित्रपटाला त्यांचा आवाज दिला आहे. त्याच बरोबर या चित्रपटातील ‘पेटून उठू दे एक ज्वाला’ हे स्त्री वर्गाला स्फुर्ती देणाऱ्या गीताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा स्वर लाभला आहे.  

                               ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटाचे लेखक आबा  गायकवाड असून संगीतकार बापी  - टूटूल व साजिद वाजीद हे आहेत. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते कॅमेरामन महेश अने हे आहेत. या चित्रपटात साहिल जोशी, मैथिली पटवर्धन, आर्या घारे, विजय पाटकर, सतीश पुळेकर, किशोर कदम आदि कलाकार या चित्रपटात आहेत. त्याच बरोबर हिंदीतील मोठे चेहरे या चित्रपटात आपणास पाहवयास मिळतील. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.  असे चित्रपटाचे निर्माते मिहीर कुलकर्णी यांनी सांगितले.  'अ ब क' या मराठी चित्रपटातून सनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अ ब क या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत असून ‘हरी’ ही व्यक्तिरेखा साकारताना आपणाला तो दिसेल.  चित्रपटाची गीते गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत. सनी पवारसह तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी असे अनेक दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्टय असे की हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. 

Web Title: A B. Prime Minister Narendra Modi gave the voice to the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.