Baahubali: मराठीत बनणा-या 'बाहुबली' सिनेमासाठी या कलाकरांचा विचार सुरू?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2017 09:17 AM2017-06-02T09:17:42+5:302017-06-02T15:14:07+5:30
'कटप्पाने बाहुबलीला का मारलं' या आजवरील सगळ्यात मोठं कोडं ठरलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील चित्रपटरसिकांना लागली होती. ...
' ;कटप्पाने बाहुबलीला का मारलं' या आजवरील सगळ्यात मोठं कोडं ठरलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील चित्रपटरसिकांना लागली होती. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सा-यांनाच उत्कंठा लागली होती ती बाहुबली- द कन्क्लुजन या सिनेमाची. एस.एस.राजामौली दिग्दर्शित बाहुबली या सिनेमानंतर बाहुबली- द कन्क्लुजन या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. या सिनेमानं तिकीटखिडकीवरील कलेक्शनचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत 1600 कोटींची कमाई केली आहे. हिंदीसह तमिळ आणि तेलुगू या भाषेतही सिनेमा तुफान गाजतो आहे. एखादा सिनेमा दक्षिणेकडे गाजला की त्याचा रिमेक करण्याची पद्धत चित्रपटसृष्टीत आहे. आजवर ब-याच दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक बनले असून बॉक्स ऑफिसवर त्याला चांगली पसंती मिळाली आहे. 'बाहुबली' हा सिनेमा विविध भाषांमध्ये गाजत असताना मराठीत हा सिनेमा आला तर ? या कल्पनेनंच तुमच्या डोक्यात या सिनेमातील ते कलाकार कोण असतील याबाबत विचार सुरु झाले असतील नाही का? समजा मराठीत बाहुबली आला तर या सिनेमात कोणते मराठी सेलिब्रिटी त्या त्या भूमिकेत चपखलरित्या फिट बसतील हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न लय भारी अभिनेता रितेश देशमुखनं आपल्या अभिनयानं रसिकांवर मोहिनी घातली आहे. हिंदीसह मराठीतही रसिकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे. सध्या तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याचंही समजतंय. मात्र बाहुबली मराठीत बनला तर रितेश या सिनेमात बाहुबलीच्या रुपात झळकू शकतो. रितेशचा लूक या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट वाटू शकतो. प्रभासने बाहुबली बनून ज्यारितीने रसिकांची मनं जिंकली अगदी त्याच पद्धतीने मराठीतला बाहुबली बनण्याची क्षमता रितेशमध्ये आहे.रितेशपाठोपाठ मराठीतली देवसेना कोण असलेल हे कोडंही आम्ही सोडवतो. ही देवसेना साकारण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत या भूमिकेत परफेक्ट वाटू शकते. नुकतंच काही फॅन्सनी सोशल मीडियावर त्याचे आवडत्या कलाकारांना बाहुबली सिनेमातल्या भूमिकांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त करत काही फोटो पोस्ट केले होते. या कलाकरांनीही हे फोटो रिट्विट केले आहेत. तेसजस्विनीसह सोनाली कुलकर्णीलाही देवसेनेची भूमिकेसाठी पसंती मिळत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता तुम्हीही ठरवा कोणती अभिनेत्री देवसेनेच्या भूमिकेत परफेक्ट वाटते ?
कटप्पा – बाहुबली सिनेमात प्रभास इतकाच हिट ठरला तो कटप्पा. माहिष्मती घराण्याशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असलेला सेवक. बाहुबली या सिनेमात अभिनेता सत्यराज यांनी कटप्पा ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली. बाहुबली या सिनेमातील कटप्पा पाहिला की मराठीतील एकमेव अभिनेता डोळ्यासमोर येतो. हा अभिनेता म्हणजे वैभव मांगले. आपल्या अभिनयाने वैभवनं रसिकांवर मोहिनी घातली आहे. मात्र कटप्पाच्या भूमिकेला साजेसं व्यक्तीमत्त्व वैभव मांगलेचं आहे. त्यामुळे या भूमिकेत कटप्पाच्या भूमिकेत आपला कोकणी वैभव मांगले चपखल बसेल नाही का?
शिवगामी – बाहुबली आणि बाहुबली 2 या सिनेमात आणखी एका अभिनेत्रीची आणि तिच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली. ही भूमिका म्हणजे राजमाता शिवगामी. अभिनेत्री राम्या कृष्णन हिनं ही भूमिका मोठ्या खूबीने रुपेरी पडद्यावर साकारली. मराठीत बाहुबली बनल्यास राजमाता शिवगामी या भूमिकेसाठी एक नाव समोर येतं ते म्हणजे अभिनेत्री मेधा मांजरेकर यांचं. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा या भूमिकेत चपखल बसू शकतात. याआधी नटसम्राट, काकस्पर्श आणि दे धक्का या सिनेमातील आपल्या भूमिकेतून त्यांनी आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. एका राजमातेला जसं हवं तसं व्यक्तीमत्त्व मेधा मांजरेकर यांचं आहे त्यामुळे राजमाता शिवगामी यांच्या भूमिकेत मेधा मांजरेकर या परफेक्ट वाटतील, नाही का ?
cnxoldfiles/span>सिनेमात सिनेमाप्रमाणेच कलाकारांनी रंगवलेल्या भूमिकाही खूप गाजल्या बाहुबली,देवसेना, कटप्पा, राजमाता शिवगामी यांच्या 'भल्लालदेव'ही रसिकांना भावला त्यामुळे मराठीतील बाहुबलीमध्ये 'भल्लालदेव' या भूमिकेसाठी मराठमोळा अभिनेता गश्मिर महाजनीचे परफेक्ट वाटू शकतो? त्यामुळे आगामी काळात मराठीत बाहुबली सिनेमा बनल्यास हे मराठमोळे चेहरे झळकले तर आश्चर्य वाटायला नको.