'नवरा मॅनेज करता येतो पण, सासू..'; शिल्पा नवलकरचा नवविवाहित तरुणींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 10:37 AM2023-06-30T10:37:53+5:302023-06-30T10:38:34+5:30

Shilpa navalkar: शिल्पा नवलकर यांनी नवविवाहित तरुणींना सासूसोबत कसं वागावं याविषयी सल्ला दिला आहे.

Baipan Bhaari Deva actress shilpa navalkar gives important advice to married girls about mother in law | 'नवरा मॅनेज करता येतो पण, सासू..'; शिल्पा नवलकरचा नवविवाहित तरुणींना सल्ला

'नवरा मॅनेज करता येतो पण, सासू..'; शिल्पा नवलकरचा नवविवाहित तरुणींना सल्ला

googlenewsNext

प्रेक्षकांची आवडनिवड लक्षात घेऊन चित्रपट, मालिकांची निर्मिती करणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे (Kedar Shinde). आजवर केदार शिंदे यांचे अनेक सिनेमा गाजले आहेत. यामध्येच आता त्यांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) हा सिनेमा येऊ घातला आहे. सध्या कलाविश्वात आणि प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अलिकडेच या सिनेमाच्या टीमने 'लोकमत पंचायत'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये संपूर्ण टीम सिनेमाविषयी आणि सिनेमाच्या सेटवर घडलेले किस्से सांगितले. यामध्येच अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी नवविवाहित तरुणींना सासूसोबत कसं वागावं याविषयी सल्ला दिला आहे.

अलिकडेच 'लोकमत पंचायत'मध्ये सुकन्या कुलकर्णी (sukanya kulkarni-mone), वंदना गुप्ते(vandana gupte), सुचित्रा बांदेकर (suchitra bandekar) आणि शिल्पा नवलकर (shilpa navalkar) या चौघींनी हजेरी लावली होती. यावेळी या चौघींनी अनेक मजेदार किस्से शेअर केले. इतकंच नाही तर या मुलाखतीच्या निमित्ताने या चौघींमध्ये असलेलं उत्तम बॉण्डिंग देखील दिसून आलं. विशेष म्हणजे यावेळी घर आणि करिअर कसं मॅनेज करावं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सासू चांगली शोधा, असा सल्ला शिल्पा नवलकर यांनी दिला.

'तुम्ही चौघीही गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात काम करताय. या काळात घर आणि करिअर दोन्ही कसं मॅनेज केलं?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, "सासू चांगली शोधा. कारण, नवरा मॅनेज करता येतो", असा सल्ला शिल्पा नवलकर यांनी दिला. त्यानंतर शिल्पाचीच री पुढे सुकन्या कुलकर्णी यांनीही सासूसोबत कसं वागावं याविषयी भाष्य केलं. "सासूसोबत गोड बोला. आपण तसंही सगळी कडे कॉम्प्रोमाईज करतो मग घरात करायला काय हरकत आहे. थोडं तिच्या मनाने वागलं की ती आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागू देत,"असं सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या.

दरम्यान, बाईपण भारी देवा हा सिनेमा आज (३० जून) प्रेक्षकांच्या भेटीला आला . या सिनेमातून सहा बहिणींची गोष्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सहा बहिणींमधील प्रेम, त्यांच्यात आलेला दुरावा आणि त्यानंतर पुन्हा त्यांची झालेली भेट हा सगळा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमातून पाहता येणार आहे.
 

Web Title: Baipan Bhaari Deva actress shilpa navalkar gives important advice to married girls about mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.