‘बाईपण भारी देवा’ने २४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी, केदार शिंदे म्हणाले, “सैराटनंतर...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 18:48 IST2023-07-24T18:47:33+5:302023-07-24T18:48:51+5:30
बॉक्स ऑफिसवर 'बाईपण'च भारी, २४ दिवसांची कमाई पाहून केदार शिंदे भारावले

‘बाईपण भारी देवा’ने २४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी, केदार शिंदे म्हणाले, “सैराटनंतर...”
‘बाईपण भारी देवा’ हा मराठी सिनेमा सध्या सर्वत्र गाजतोय. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा २४ दिवसांनंनतर बॉक्स ऑफिसवर बोलबोला कायम आहे. चौथ्या आठवड्यातही बाईपणची बॉक्स ऑफिसवरील जादू तसूभरही कमी झालेली नाही. अजूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. ‘बाईपण भारी देवा’चे २४ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने अवघ्या २४ दिवसांत ६४ कोटींचा गल्ला पार केला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत एकू ६५.६१ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’ची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून केदार शिंदेही भारावून गेले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
“...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट
“ही तर श्री स्वामींची कृपा...हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद...मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. ‘सैराट’नंतरचा ‘बाईपण’ ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा...”, असं केदार शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने खासकरुन महिला वर्गाला भुरळ घातली आहे. या चित्रपटात काकडे सिस्टर्सच्या भूमिकेत रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुकन्या मोने, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री आहेत.