'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! केदार शिंदेंच्या चित्रपटाने १४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 17:00 IST2023-07-14T16:59:38+5:302023-07-14T17:00:09+5:30
'बाईपण भारी देवा'ची छप्परफाड कमाई, १४दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! केदार शिंदेंच्या चित्रपटाने १४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन आठवड्याच दमदार कमाई करत तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंच्या या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचं १४ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
बाईपणाची भारी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या चारच दिवसांत ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली. दुसऱ्या वीकेएण्डला १३.५० कोटींचा गल्ला जमवत दहा दिवसांत २६.१९ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. एकाच दिवशी ६.१० कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट हा रेकॉर्डही बाईपण भारी देवा चित्रपटाने नावावर केला आहे.
बाईपण खरंच भारी बाबा! सिनेमासाठी महिलांनी केला ४५ किमीचा प्रवास
केदार शिंदेंचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला असून बॉक्स ऑफिसवर सुसाट आहे. या चित्रपटाने १४ दिवसांत ३७.३५ कोटींची विक्रमी कमाई करत तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केलं आहे. केदार शिंदेंनी पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता 'बाईपण भारी देवा' आणखी कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
"सुरुवात चांगली झाली...", Chandrayaan-3च्या यशस्वी उड्डाणानंतर हेमंत ढोमेने केलेलं ट्वीट चर्चेत
बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' चित्रपटात काकडे सिस्टर्स या सहा बहिणींची अनोखी गोष्ट दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात सुकन्या मोने, रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.