"मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! 'बाईपण भारी देवाचं' दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 04:04 PM2023-07-14T16:04:53+5:302023-07-14T18:00:29+5:30

बाईपण भारी देवा सिनेमा रिलीज झाल्यापासून केदार शिंदे दररोज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या यशात वाटेकरी असणाऱ्यांचं कौतुक करत आभार मानतात.

Baipan bhari deva director kedar shinde share post for singers of the movie | "मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! 'बाईपण भारी देवाचं' दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

"मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! 'बाईपण भारी देवाचं' दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

'बाईपण भारी देवा' या सुपरहिट मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. खासकरुन महिलावर्ग हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंच्या एक पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बाईपण भारी देवा सिनेमा रिलीज झाल्यापासून केदार शिंदे दररोज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या यशात वाटेकरी असणाऱ्यांचं कौतुक करत आभार मानतात. आता त्यांनी चित्रपटाचा गाभा असणाऱ्या गायकांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

केदार शिंदेंची पोस्ट 
मध्ये खरतर चार गाणी. त्यातलं टायटल व पिंगा हे कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅट सॅांग आहे.. स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं.. "उघड्या पुन्हा जाहाल्या". नवॅ गाणं करायचं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं. असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. ते गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी @suvarna_music . कमाल गायलय. आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार? लवकरच.. आणि... शेवटचं गाणं. "मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र collage करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात. पण सिनेमात ते गाणं ३-४ मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र @savanieeravindrra कम्माल गायली आहे. त्याची सुरूवातीची आरती ज्या सुकूनने ती गायली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तीचा आवाज घरंदाज वाटतो. सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटर मध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या सिनेमा साठी या सगळ्यांचं योगदान खुप मोठं आहे.


सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांत २६ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात सुकन्या मोने, रोहिणी हट्टांगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 

Web Title: Baipan bhari deva director kedar shinde share post for singers of the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.