लेकीला कायम पाठिंबा देणाऱ्या सुकन्या मोनेंच्या आईला पाहिलंय का? पहिल्यांदाच आल्या कॅमेरासमोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:57 AM2023-12-17T10:57:57+5:302023-12-17T10:58:17+5:30
Sukanya kulkarni: सुकन्या मोने यांची आई सुद्धा त्यांच्यासारखीच दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या असल्याचं दिसून येतं.
दमदार अभिनयकौशल्य आणि तितकच दिलखुलास व्यक्तीमत्व असलेली अभिनेत्री म्हणजे सुकन्या कुलकर्णी-मोने (sukanya kulkarni-mone). अलिकडेच त्यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यामुळे यावर्षीचा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला सिनेमा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नुकतंच या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. या स्क्रिनिंगला बाईपण भारीच्या सगळ्या टीमने हजेरी लावली होती. परंतु, यावेळी सुकन्या मोने यांच्या आईने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
‘बाईपण भारी देवा’च्या स्पेशल स्क्रिनिंगला सुकन्या मोने यांनी त्यांच्या आईसोबत हजेरी लावली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांची आई कॅमेरासमोर आली. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. विशेष म्हणजे सुकन्या यांची आई त्यांच्या इतकीच दिलखुलास आणि एनर्जेटिक असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
दरम्यान, आईच्या पाठिंब्यामुळेच सुकन्या कुलकर्णी आज यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकल्या आहेत. त्यांच्या आईने वेळोवेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करत कायम पाठिंबा दिला. इतकंच नाही तर सुकन्या यांना कलेची आवडदेखील आईमुळेच लागली.