​लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारित आहे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटचा आम्ही दोघी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:16 AM2018-02-09T09:16:22+5:302018-02-09T14:46:22+5:30

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण असलेला आणि पूजा छाब्रियानिर्मित बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘आम्ही दोघी’ येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित ...

Based on the story of writer Gauri Deshpande, both of us are Mukta Barve and Priya Bapat | ​लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारित आहे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटचा आम्ही दोघी

​लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारित आहे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटचा आम्ही दोघी

googlenewsNext
्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण असलेला आणि पूजा छाब्रियानिर्मित बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘आम्ही दोघी’ येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. प्रतिमा जोशी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा प्रख्यात दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेली आहे. ‘आम्ही दोघी’ चित्रपटाची माहिती देण्यासाठी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्रिया बापट, भूषण प्रधान, आरती वडगबालकर, किरण करमरकर, प्रसाद बर्वे, दिग्दर्शिका प्रतिमा जोशी, पटकथा आणि संवाद लेखिका भाग्यश्री जाधव आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया उपस्थित होते.
चित्रपटाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई या दोन प्रमुख पात्रांभोवती बेतलेली आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा अनुक्रमे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी साकारल्या आहेत. विचारसरणी वेगळ्या असल्या तरी महिला इतर बाबतीत एकसारख्याच असतात. त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्या मार्ग वेगवेगळे चोखाळतात. मुक्ता बर्वे साकारत असलेली व्यक्तिरेखा ही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका गृहिणीची आहे. तिला शहरी भागाच्या जीवनशैलीचा तसा गंध नाही तर प्रिया बापट ही एक थोडी वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारते आहे.
“मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.
“आम्ही दोघी’ हा चित्रपट प्रख्यात दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला आहे. गौरी देशपांडे या काळाच्या पुढे चालणाऱ्या प्रागतिक लेखिका होत्या. त्यांच्या कादंबरी, लघुकथा आणि कविता खूपच गाजल्या. त्यांनी स्वतःच्या शैलीतून साहित्यिक जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले. गौरी देशपांडे यांच्या लिखाणावर बेतलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. मी फार पूर्वीच ठरविले होते की जेव्हा केव्हा मी स्वतः चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा तो गौरी देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारित असेल. आजच्या तरुणींना त्यांच्या नात्यांमध्ये जे संबंध अपेक्षित असतात, त्यांच्या जवळ जाणारी ही कथा आहे. ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची आणि म्हणूनच त्यांना प्रिय असलेली गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. हा विषय प्रत्येक तरुणीशी भावनात्मकरित्या जोडला जाणारा आहे, म्हणूनच प्रेक्षक त्याबाबत संवेदनशीलरित्या जोडला जाईल” असे दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांनी सांगितले.

Also Read : ​मुक्ता बर्वे कोणाला करतेय मिस?

Web Title: Based on the story of writer Gauri Deshpande, both of us are Mukta Barve and Priya Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.