खरा पुरूष हो भावा...! ट्रोलरने तृतीयपंथ्याशी केली तुलना, संतोष जुवेकरने दिला ‘एकदम कडक’ सल्ला

By रूपाली मुधोळकर | Published: September 21, 2020 12:49 PM2020-09-21T12:49:05+5:302020-09-21T13:24:19+5:30

संतोषने या ट्रोलरला असे काही उत्तर दिले की, त्याची बोलती बंद झाली. 

Be a real man, brother ...! santosh juvekar slams troller for saying he looks like transgender | खरा पुरूष हो भावा...! ट्रोलरने तृतीयपंथ्याशी केली तुलना, संतोष जुवेकरने दिला ‘एकदम कडक’ सल्ला

खरा पुरूष हो भावा...! ट्रोलरने तृतीयपंथ्याशी केली तुलना, संतोष जुवेकरने दिला ‘एकदम कडक’ सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्दे संतोषने या कमेंटचा आणि त्याला दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉर्टही शेअर केला आहे.

सोशल मीडियावर कोण कधी ट्रोल होईल, याचा नेम नाही. आता अभिनेता संतोष जुवेकर याचेच उदाहरण घ्या. संतोषने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली आणि या पोस्टवरून तो ट्रोल झाला. पण संतोषने या ट्रोलरला असे काही उत्तर दिले की, त्याची बोलती बंद झाली. खरे तर संतोषची ही पोस्ट तशी जुनी आहे. पण यावर ट्रोलरला संतोषने दिलेले उत्तर असे काही झकास आहे की, संतोषच्या कमेंटचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय.

तर संतोषने त्याचा क्लीन शेवमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
‘ब-याच दिवसांन दाढी भादरलीया. मैत्रिणीला फोटू पाठवला तर म्हनली कवळा रतन दिसतुयास....... आयला टाळकंच सरकलंना भावा आपलं तीला म्हनलं......." संतोष नाव हाय माझं ह्यो रतन कोन आणलास आनी?"
कधी कधी असं गुळगुळीत पण चरचरित दिसत नाय!!?? आयला बेन स्वतःचीच लाल करालाय ’, असे मजेदार कॅप्शन देत संतोषने ही नव्या लूकमधील सेल्फी पोस्ट केली होती.

संतोषच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भारी भारी कमेंट्स केल्यात. पण संभाजी पाटील नावाच्या एका युजरने मात्र यावरून संतोषला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘मिशी काढल्यामुळे एकदम छक्क्यासारखा दिसतोय,’ अशा शब्दांत त्याने संतोषला ट्रोल केले.

खरा पुरूष हो भावा...
या युजरला संतोषने असे काही भन्नाट उत्तर दिले की, त्याची बोलती बंद झाली.
संतोषने लिहिले, ‘मित्रा जे नाव टीका करण्यासाठी उच्चारले, त्या नावात खूप मोठी ताकद आहे. या नावात पुरुष आणि आदिशक्ती स्त्री या दोघांचीही ताकद सामावली आहे.   देवाचा आणि निसर्गाचा अविष्कार आहे हे नाव. आदर करतो मी त्याचा. तुही कर आणि खरा पुरुष हो भावा.’

संतोषने शेअर केला स्क्रिनशॉट
 संतोषने या कमेंटचा आणि त्याला दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉर्टही शेअर केला आहे. ‘मी आत्ता माझा एक फोटो पोस्ट केला त्यावर  आपल्या मित्राने ही कमेंट केली. त्यावर मी त्याला उत्तरात दिलेय. माझा राग नाही त्याच्यावर आणि तुम्हीही राग करू नका. पण अशा विचारांच्या माझ्या मित्रांना लवकर बरं कर रे देवा, अशी अर्धनारी नटेश्वराला प्रार्थना करूया,’ असे हा स्क्रिनशॉट शेअर करताना संतोषने लिहिले आहे.

Web Title: Be a real man, brother ...! santosh juvekar slams troller for saying he looks like transgender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.