फोटोतील ही गोंडस चिमुकली ओळखा पाहू कोण? आज करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 20:57 IST2021-05-28T20:56:56+5:302021-05-28T20:57:32+5:30
या अभिनेत्रीला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

फोटोतील ही गोंडस चिमुकली ओळखा पाहू कोण? आज करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य
आठवणींच्या सुगंधी कुपीत काही क्षण जपून ठेवायचे असतात,आयुष्य सुगंधी राहण्यासाठी... आयुष्यात जरा मागे वळून पाहिले की अनेक आठवणी भेटतात. अनेक सेलिब्रिटी अधूनमधून बालपणीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देत असतात. मराळमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) त्यापैकीच एक.
मध्यंतरी प्रियाने बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या फोटोत चिमुकली, गोंडस प्रिया चाहत्यांना पाहायला मिळाली होती. यात ती तिच्या बाबांसोबत दिसली होती. (Priya Bapat Childhood Photo)
साहजिकच प्रियाचा हा सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला होता.
उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.
प्रियाने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिची सिटी आॅफ ड्रिम्स ही वेबसिरिज तर चांगलीच गाजली होती. प्रिया तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे, तिच्या कुटुंबियांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
काकस्पर्श, टाईमपास-२, टाईम प्लीज, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, वजनदार या मराठी चित्रपटांबरोबरच ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे.