सासरी रमेपर्यंत तुझी आठवण कायम..; लग्नाआधी प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोची डोळ्यात पाणी आणणारी भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 02:50 PM2024-02-23T14:50:34+5:302024-02-23T14:51:03+5:30

प्रथमेश परबची होणारी बायको क्षितीजाने सोशल मीडियावर लग्नाआधी एक भावूक पोस्ट लिहीलीय. (Prathamesh Parab Wedding)

before marriage prathamesh parab wife kshitija ghosalkar emotional post | सासरी रमेपर्यंत तुझी आठवण कायम..; लग्नाआधी प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोची डोळ्यात पाणी आणणारी भावूक पोस्ट

सासरी रमेपर्यंत तुझी आठवण कायम..; लग्नाआधी प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोची डोळ्यात पाणी आणणारी भावूक पोस्ट

'टाईमपास' फेम प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर या दोघांच्या लग्नाची धामधून सध्या सुरु आहे. प्रथमेश - क्षितीजा (Kshitija Ghosalkar) उद्या २४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी काहीच दिवसांपुर्वी साखरपुडा केला. याशिवाय त्यांच्या हळदी - मेहंदी सेरेमनीचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले. अशातच लग्नाच्या पूर्वसंध्येला क्षितीजाने सोशल मीडियावर तिच्या घराचे फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट लिहीली आहे. 

क्षितीजा लिहीते, "Dear Home Sweet Home, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर.. आजपर्यंत , तुझी "माझं घर", अशी असलेली ओळख आता "माझं माहेर", अशी होणार.. आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार.. तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खाज एक चेहराच मिळालाय!!
बघ ना, काही मनसोक्त हसतायत.. काही अलवार रडतायत..काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय, तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल!!! त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार!



क्षितीजा पुढे लिहीते, "सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला... तुही मग तयार रहा, आपलं नेहमीचं हितगुज करायला.. PS- सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल." अशी पोस्ट लिहून क्षितीजाने घराची आठवण जागवली आहे. क्षितीजा - प्रथमेश उद्या २४ फेब्रुवारीला थाटामाटात एकमेकांशी लग्न करणार आहेत.

Web Title: before marriage prathamesh parab wife kshitija ghosalkar emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.